Maharashtra Breaking News LIVE Updates: CM फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं - रोहित पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील ठळक घडामोडींचा थेट आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: CM फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं - रोहित पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकारणातील प्रत्येक घडामोडींचा आढावा या लाइव्बब्लॉगच्या माध्यमातून घेऊया. 

17 Dec 2024, 12:24 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: उद्धव ठाकरे एक वाजता पत्रकार परिषद घेणार

17 Dec 2024, 11:54 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित विधेयक लोकसभेत सादर

वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले असून कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडले.  संविधानाचे 129 वे दुरुस्ती विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 सादर करण्यात आले

17 Dec 2024, 11:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलनेचा आहे; भुजबळांनी बोलवून दाखवली खंत

17 Dec 2024, 11:25 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार

25 जानेवारीपासून मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे.

17 Dec 2024, 11:10 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: बीड हत्याकांडाचे विधानसभेत पडसाद

बीड हत्या कांडाचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपच्या आमदार नमिता मुंडदा यांनी मुद्दा उपस्थित केला होता.  वाल्मिक कराड हा व्यक्ती आहे हा क्रिमिनल माणूस आहे, त्याला 2 बॉडीगार्ड कसे मिळतात? खंडणी प्रकारांत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पण इतर बाबतीत त्याचा समावेश का नाही? अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये मोठा मोर्चा काढू, असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे. तर, नमिता मुंदडा यांनी संतोष देशमुखच्या हत्येतील मुख्य माणूस फरार आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी मोठी मागणी केली आहे. 

17 Dec 2024, 11:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: परभणीचा मुद्दा काँग्रेसकडून उपस्थित

परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे. परभणीच्या प्रकरणामध्ये सुनियोजित कट होता असा वास येतो आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.  

17 Dec 2024, 11:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात

17 Dec 2024, 10:36 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीआधी शिवसेना आमदारांची बैठक 

विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना आमदारांची बैठक. विधानभवनात सर्व शिवसेना आमदारांना दहा वाजता उपस्थित राहण्याचे आदेश. आज उद्धव ठाकरे देखील विधान परिषदेत उपस्थित राहणार असल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. त्यामुळे पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी तसेच काही महत्त्वाचे मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बोलवली आमदारांची बैठक

17 Dec 2024, 10:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates:  ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेकडे की भाजपकडे ?

राज्य मंत्रिमंडळाच्या नव्या विस्तारात ठाणे जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यात दोन शिंदेसेनेकडे आणि एक भाजपला मिळाली आहे. भाजपने गणेश नाईक यांना मंत्रिपद देऊन शिंदेसेनेला शह देण्याची खेळी खेळली आहे. शिंदे आणि नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष सतत ताणलेला असून, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे जातो की शिंदेसेनेकडे, यावरून उत्सुकता आहे

17 Dec 2024, 10:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates:  भाजपचे सात पदाधिकारी सहा वर्षासाठी पक्षातून निष्कासित

विधानसभेमध्ये अकोला पश्चिमचे भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव झाला राज्यात आणि जिल्ह्यात महायुतीची लाट असूनही भाजपचा उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला... भाजपने यानंतर पराभवाचं मंथन करत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या सात पदाधिकाऱ्यांचा शोध लावून त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निष्कासित केलं आहे. यामध्ये भाजपच्या माजी महिला महापौर अश्विनी हातवळणे त्यांचे पती प्रतुल हातवळणे , माजी नगरसेवक हरिभाऊ काळे , आशिष पवित्रकार , गिरीश गोखले यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.