Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
27 Aug 2024, 07:59 वाजता
सतेज पाटील आज मालवणमध्ये
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज सकाळी 9 वाजता सतेज पाटील या ठिकाणी पहाणी करण्यासाठी पोहचत आहेत.
27 Aug 2024, 07:58 वाजता
नौदल अधिकारी करणार राजकोट किल्ल्याची पहाणी
सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळल्यानंतर आज नौदल अधिकारी राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहेत.