Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून

Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात व देशभरात आता मान्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, आता राज्याच्या राजकारणातही विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. तर, एकीकडे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह अपडेट्समधून

1 Jul 2024, 15:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी 

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून, राजकीय पुनर्वसनाच्या चर्चा सुरु असतानाच विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव समोर आलं आहे. भाजपकडून 5 नावं समोर आली असून, यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांच्या नावाचा समावेश आहे. 

1 Jul 2024, 15:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अग्निवीर योजनेचा सरकारला फायदा काय? राहुल गांधींचा सवाल 

अग्निवीर योजनेचा सरकारला फायदा काय? अग्निवीरांना सरकार जवान समजत नाही. अग्निवीराला शहिदाचा दर्जा का नाही? राहुल गांधी यांचा भाजपप्रणित सरकारवर घणाघात. लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं गदारोळ. दिशाभूल करू नका म्हणत अमित शाह यांनी प्रत्युत्तर देऊनही राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करणं सुरूच ठेवलं. 

1 Jul 2024, 12:41 वाजता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज घेण्यासाठी पंढरपूर तलाठी कार्यालयात महिलांची झुंबड

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मानधन मिळावे यासाठी महिलांचा मोठा प्रतिसाद 

कागदपत्र घेऊन महिला तलाठी कार्यालयात

1 Jul 2024, 12:01 वाजता

विधानपरिषदेच्या जागांवरुन एकनाथ शिंदेंची डोकदुखी वाढणार

दोन जागांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी.

संजय मोरे, मनिषा कायंदे, भावना गवळी, राहूल शेवाळे, कृपाल तुमाने विधान परिषदेसाठी इच्छूक.

लोकसभेत उमेदवारी नाकारलेल्यांची विधानपरिषदेत पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी

1 Jul 2024, 11:50 वाजता

बारामती लोकसभेचा लेखी अहवाल अजित पवारांना सादर करण्यात आला आहे. बारामती लोकसभेत कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती होती, मतांची टक्केवारी किती होती पराभव नक्की का झाला याचा अहवाल अजित पवारांना सादर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस जिल्ह्याध्यक्षांनी हा अहवाल सादर केला. अजित पवार अधिवेशनानंतर बारामती लोकसभेतील पदाधिकाऱ्यांची विधानसभेसाठी घेणार आढावा बैठक अहवालावर अजित पवार विधानसभेसाठी तयारी करणार आहेत.

1 Jul 2024, 11:48 वाजता

सत्ताधारी आमदाराने उडविले विरोधकांचे आंदोलनांचे प्लाकार्ड

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी पायऱ्यांवर आंदोलनासाठी एकवटले

ह्यावेळी आमदार सचिन अहिर यांनी आमदार रैम कदम यांच्यासमोर प्ला कार्ड धरला तो आमदार बांगर यांनी उडविला

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हातातून ही प्ला कार्ड घेत तो हवेत फेकून देतानाचा व्हीडीओ समोर आलाय

1 Jul 2024, 10:36 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन सुरू

सत्ताधारीही दुस-या बाजूला पोस्टर घेवून आले
सत्ताधारी विरोधक आमनेसामने
विरोधक आमदार सत्ताधारी आमदारांसमोर येवून करतायत आंदोलन
पेपरफुटी,नीट विरोधात विरोधकांचे आंदोलन

1 Jul 2024, 10:36 वाजता

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आज सकाळी ११ वाजता राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहेत. तर, लोकसभेत दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहेत.

1 Jul 2024, 10:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कडेगाव मध्ये 30 जणांना गॅस्ट्रोची लागण,आमदार विश्वजित कदमांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

सांगलीच्या कडेगाव मध्ये गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. एकाच दिवसात 30 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान कडेगाव शहरामध्ये गँस्ट्रोची साथ पसरल्याची माहिती मिळताच,आमदार विश्वजित कदम यांनी तात्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रूग्णांची विचारपूस करत आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याचा सूचना दिल्या.

1 Jul 2024, 09:56 वाजता

पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीच्या सुटकेविरोधात पुणे पोलीस सुप्रीम कोर्टात आव्हान देणारय़...पोर्श कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला सुधारगृहातून सोडण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले...मात्र, राज्य गृहविभागाने पुणे पोलिसांना सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची परवानगी दिलीय...