Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून

Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात व देशभरात आता मान्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, आता राज्याच्या राजकारणातही विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. तर, एकीकडे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह अपडेट्समधून

1 Jul 2024, 20:59 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: दीक्षाभूमी वादावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया 

'दीक्षाभूमीचा आराखडा स्मारक समितीच्या संमतीने तयार केला, यात आक्षेप असतील तर ते ऐकून घेतली पाहिजे. आमचा राज्यसरकार म्हणून काम कसे व्हावे असा कुठलाही आग्रह नाही, आंदोलक आणि स्मारक समितीने तोडगा काढावा. यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. दीक्षाभूमी समिती आणि आंदोकांनी ठरवावे जो पर्यंत सगळे ठरवत नाही तो पर्यंत कुठलेही काम होणार नाही', असं म्हणत सगळ्यांच्या शंकांचे निरसन व्हावे असा सूर देवेंद्र फडणवीस यांनी आळवला. 

1 Jul 2024, 20:16 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरांसंदर्भातील सर्वात मोठी बातमी 

दूध उत्पादन संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडणार असून, या बैठकीला रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत देखील उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. दूध उत्पादन संदर्भात अनेक प्रश्नांवर इथं चर्चा होणार असून, दूध दरात वाढ करण्याची या बैठकीत शक्यता आहे. ज्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल असं सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये दुधाला 30 रुपयांचे दर मिळवून देत ते स्थिर ठेवण्यावर भर दिला जाईल. यामध्ये 5 रुपये शासनाचं अनुदान असल्याचा निर्णय होऊ शकतो. 

1 Jul 2024, 19:40 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कल्याणमधून गंभीर घटना समोर... 

कल्याण पूर्व 100 फुटी चौक परिसरात गंभीर घटना घडली असून, एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संदीप राठोड असे जखमी तरुणाचे नाव असून, चार ते पाच जणांनी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोळशेवाडी पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी धाव घेतली. सध्याच्या घडीला जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

 

1 Jul 2024, 19:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले

राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटलेत. प्रसाद लाड यांनी आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केला. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संसदेतील विषय असून आपल्या कामकाजाशी संबंध नसल्याचं यावेळी सभागृहात सांगितलं. त्यावेळी प्रसाद लाड दानवेंकडे हातवारे करून बोलत होते. दानवेंनी माझ्याकडे हातवारे करून बोलायचं नाही, असं म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय. एकच गोंधळ उडाल्यानंतर विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. तर आपण कोणालाही घाबरत नसून काय कारवाई करायची ती आपला पक्ष करेल असं दानवे म्हणालेत. 

1 Jul 2024, 19:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: उद्धव ठाकरेंची चौकशी सरकार करणार का? 

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात चौकशी करण्याची वेळ आल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चौकशी सरकार करणार का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला. तर प्रसिद्धी पाहिजे तर उद्धव ठाकरेंचं नाव घ्या ही महाराष्ट्रातील राजकारण्यांची गरज झाल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केलीये. 

1 Jul 2024, 18:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: भाजपला जबरदस्त दणका 

विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला जबरदस्त दणका दिला आहे.  सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब पुन्हा विजयी झाले आहेत. 

1 Jul 2024, 17:43 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: लोणावळ्यात वाहून गेलेला पाचवा मृतदेह सापडला 

लोणावळ्यातील भुशी डॅम इथं पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या कुटुंबापैकी आणि एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. 

1 Jul 2024, 17:41 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित 

शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यात मुंबई पदवीधर मतदारसंघाचे, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब सध्या आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या जल्लोष सुरू आहे. 

अनिल परब  यांचा विजय निश्चित

अनिल परब - 44791
किरण शेलार - 18771
लीड - 26020

1 Jul 2024, 17:13 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: आज माऊली, तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम कुठे?

पुण्यात आज संत ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखी मुक्कामी आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या अभंगाचा प्रत्यय आज पुण्यात पाहायला मिळाला. पुण्यात सर्वधर्मीय दिंडीचा आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू मुस्लिम शिखी साई बौद्ध भिक्खू यांच्या वेशभूषेत आलेल्या वारकऱ्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. या दिंडीच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. टाळ मृदंगाच्या गजरात आपण सर्वजण एक आहोत हा संदेश वारकऱ्यांनी दिला.

1 Jul 2024, 17:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: दिक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंगला विरोधातील आंदोलक हिंसक

दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला विरोधान आज उग्र रूप धारण केल. अंडर ग्राउंड पार्किंगला विरोध करत आज जमा झालेल्या आंदोलकांनी बांधकाम ठिकाणी तोडफोड केली. काही बांधकाम साहित्यची जाळपोळ करत पटवले. आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी पार्किंगच्या दृष्टीने चर्चेकरता आंदोलकाला बोलवले होते. मात्र समितीकडून कोणीच चर्चेला आलं नाही. त्यानंतर आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी ही पार्किंग बांधकाम सुरु असलेल्या जागी तोडफोड, जाळपोळ केली..दीक्षाभूमीत विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र यात अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध आहे.