Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून

Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात व देशभरात आता मान्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, आता राज्याच्या राजकारणातही विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. तर, एकीकडे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह अपडेट्समधून

1 Jul 2024, 09:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात मुकामी असलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकेच स्नान आणि अभिषेक

पुण्यात मुकामी असलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकेच स्नान आणि अभिषेक सुरू आहे. निवडुंगा विठोबा मंदिरात पादुका अभिषेक करण्यात येतोय. मोठ्या भक्तीमुळे वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पादुका अभिषेक सुरू आहे

1 Jul 2024, 09:17 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर  भीषण अपघात; 4 ठार

यवतमाळच्या जिल्ह्यात नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर चापर्डा गावाजवळज ट्रक आणि इनोव्हा कार मध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.

1 Jul 2024, 09:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: उपसभापतीसाठी अयोध्येतील सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्या नावाची शिफारस

ममता बॅनर्जी यांनी उपसभापतीपदासाठी अयोध्येतील सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्या नावाची शिफारस केली आहे.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजनाथ सिंह यांना फोन करून हा प्रस्ताव दिला आहे. सभापती निवडीनंतर आता उपसभापतींबाबत विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. अवदेशकुमार यांना समोर ठेवून विरोधी  सरकारवर दबाव आणत आहे.

1 Jul 2024, 09:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: एल 3 बार मधील ड्रग्ज पार्टी प्रकरण; पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री बार मध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीप्रकरणात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या साखळीतील आणखी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील ड्रग्जचा पुरवठा करणारी नवी साखळी समोर येऊ लागली आहे. अक्षय स्वामी तसेच आर्यन पाटील (रा. पुणे) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

1 Jul 2024, 08:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कोकण पदवीधर निवडणूक: निकालाआधीच निरंजन डावखरे यांच्या अभिनंदनाचे बॅनर

निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आहेत. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच लागले बॅनर. भाजप रायगड जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी लावले बॅनर. कोकण पदवीधर मतदार संघाची आज नेरूळ इथं मतमोजणी.  महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात प्रमुख लढत

1 Jul 2024, 08:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुणेकरांची तहान भागवणाऱ्या  धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

पुणेकरांची तहान भागवणाऱ्या  धरणांच्या पाणी साठ्यात वाढ.खडकवासला, पानशेत ,वरसगाव धरण परिसरात पावसामुळे धरणाचा पाणीसाठा वाढला. प्रत्येकी अर्धा टीएमसी ने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे पालखी सोहळ्यासाठी खडकवासला धरणातून काही प्रमाणत पाणी सोडण्यात आले आहे

1 Jul 2024, 08:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात झिकाचा धोका वाढला; गर्भवतीला संसर्ग

एरंडवणे परिसरातील एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. रुग्ण आढळून आलेल्या एरंडवणे आणि मुंढवा परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे

1 Jul 2024, 07:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिक्षक, पदवीधरची आज मतमोजणी; कुणाची बाजी? 

विधानपरिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी नवी मुंबईत होणार आहे.

1 Jul 2024, 07:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारला  दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट केली. मंगल आणि पवित्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दोन वर्षांपूर्वी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जनतेची साथ, विश्वास हेच माझे संचित आहे. तुमच्या प्रेमाच्या, आशीर्वादाच्या बळावर आणि सहकाऱ्यांच्या विश्वासावरच मी राज्याचे नेतृत्व करत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

1 Jul 2024, 06:43 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मत पत्रिकेसह सेल्फी घेऊन समाजमाध्यमांवर व्हायरल भाजपच्या महिला अध्यक्षावर गुन्हा दाखल

निवडणुकीत मतदान केल्यानंतर मत पत्रिकेसह सेल्फी घेऊन फेसबुक आणि व्हॉटसअप स्टेटसला ठेवून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार कोकण पदवीधर मतदार संघाच्या मतदानाच्या दिवशी समोर आला होता. याप्रकरणी अंबरनाथचे नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे