Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून

Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात व देशभरात आता मान्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, आता राज्याच्या राजकारणातही विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. तर, एकीकडे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह अपडेट्समधून

1 Jul 2024, 06:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी; व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात 

तेल कंपन्यांनी 19 किलो कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. 30 रुपयांनी दर घसरले असून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल करण्यात आले नाहीयेत.