Breaking News LIVE: राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची नावे राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती

दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Dakshata Thasale | Oct 14, 2024, 20:53 PM IST
twitter
Breaking News LIVE: राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची नावे राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

14 Oct 2024, 20:53 वाजता

राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची नावे राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. यात भाजप कडून 3, शिवसेना शिंदे गटाकडून 2 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 2 नाव देण्यात आली आहे.  राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती विरोधात ठाकरे गटाचे सुनील मोदी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती 

14 Oct 2024, 19:51 वाजता

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती.अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. 

सविस्तर बातमी येथे वाचा

 

14 Oct 2024, 19:09 वाजता

मुंबईच्या मालाड पूर्वेत दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या

रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली.
मनसे कार्यकर्ता आकाश माईन (27) दसऱ्यानिमित्त संध्याकाळी नवीन गाडी घेण्यासाठी मालाड स्टेशनवर गेला होता.
परत येत असताना मालाड पूर्वेत स्टेशन जवळ रिक्षावाल्याने कट मारल्यामुळे मनसे कार्यकर्ता आणि रिक्षावाल्याबरोबर बाचाबाची सुरू झाली.
मालाड स्टेशनवर असलेले रिक्षा चालकाचा मित्र फेरीवाल्यांनी यावेळी गर्दी जमा करून दहा ते बारा लोकांनी मनसे कार्यकर्तावर हल्ला केला.

 

14 Oct 2024, 19:02 वाजता

पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला ही पकडण्यात आले आहे 

उत्तर प्रदेश मधील प्रयाग येथून ताब्यात घेतले आहे 

बोपदेव घाट प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय 

पुणे गुन्हे शाखेच्या टीमने कारवाई केली

14 Oct 2024, 18:57 वाजता

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

उद्याही सुनावणी होण्याची शक्यता कमीच

प्रकरण सुनावणीसाठी उशिरा येणार असल्याने सुनावणीची शक्यता कमीच

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्रन केल्याने सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत याचिका

प्रकरण सकाळी मेंशन केलं तरच सुनावणी होण्याची शक्यता

14 Oct 2024, 18:04 वाजता

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर येण्याची शक्यता - सूत्रांची माहिती

आज रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती

रात्री उशिरा अमित शहा यांच्यासोबत देखील भेट होण्याची शक्यता

14 Oct 2024, 17:19 वाजता

बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणातील आरोपी प्रवीण लोणकरला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी 

कोर्टाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकरला केलं कोर्टात हजर
वैद्यकीय तपासणीनंतर कोर्टात हजर केलं
कोर्टाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

14 Oct 2024, 16:23 वाजता

भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द 

माझगाव कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाकडून वॉरंट रद्द 

संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात नितेश राणेंना हजर राहावेच लागणार 

17 ऑक्टोबरला नितेश राणे यांना माझगांव कोर्टात हजर राहावे लागणार 

नितेश राणे यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती शाम चांडक यांनी दिला 

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात घेतली होती धाव 
खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी दाखल केली होती याचिका 

माझगाव कोर्टाने ऑगस्ट महिन्यात राणेंविरोधात बजावला होता अजामीनपात्र वॉरंट 

14 Oct 2024, 15:36 वाजता

उद्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद

विधानसभेच्या अनुषंगाने जागावाटपासह इतर काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेला संबोधित करणार 
आज दिल्लीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची बैठक 

तर बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत कोणत्या घोषणा होणार याकडे लक्ष

14 Oct 2024, 14:47 वाजता

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजपची आज बैठक 

दुपारी 2 वाजता पक्षाच्या मुख्यालयात बैठक होण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांची निवड, सहयोगी पक्षांसोबत जागावाटप, आणि विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता.  

महाराष्ट्र कोअर ग्रुपच्या सदस्यांव्यतिरिक्त प्रदेश प्रभारी, निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय नेतृत्व बैठकीला उपस्थित राहणार.