बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण; मुंबई क्राइम ब्रॅंचच्या डीसीपींनी दिली मोठी अपडेट

Baba Siddique Murdered Mumbai Crime Branch Press Conference: बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर मुंबई क्राइम ब्रॅंचने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 13, 2024, 05:52 PM IST
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण; मुंबई क्राइम ब्रॅंचच्या डीसीपींनी दिली मोठी अपडेट title=
मुंबई क्राइम ब्रॅंचच्या डीसीपींनी दिली मोठी अपडेट

Baba Siddique Murdered Mumbai Crime Branch Press Conference: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर मुंबई क्राइम ब्रॅंचने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. 
 
काल 9 ते 9.30 च्या दरम्यान माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबाराची घटना निर्मल नगर पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली. एपीएआय राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्या सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना पकडले. दोघांकडे फायर आर्म्स होते, हे माहिती असूनही दोघांनी कामगीरी पार पडली. घटनास्थळावरुन एक आरोपी पळून गेलाय. डीसीपी दत्ता नलावडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

आरोपींकडून 2 पिस्टल आणि 28 राउंड हस्तगत करण्यात आले आहेत. या घटनेतील लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग आहे का? याचा तपास आम्ही करत आहोत.गुरमित सिंहला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा नेमकं काय घडलं? जाणून घ्या A टू Z कहाणी!

3 हल्लेखोर होते. यातील 2 आरोपींना तात्काळ पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. तिनही आरोपींचे रेकॉर्ड आम्ही तपासत आहोत. त्यांना कॅटगराइज प्रोटेक्शन नव्हत. 3 पोलिसांची सुरक्षा त्यांना देण्यात आली होती. हल्ला झाला तेव्हा एकच पोलीस त्यांच्या सोबत होता, अशी माहिती क्राइम ब्रॅंचने दिली.