Breaking News LIVE: शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसाच्या आत सरसकट पाहणी करून 25% अग्रीम

Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्रातील घडामोडींचे अपडेट एका क्लिकवर. 

Breaking News LIVE: शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसाच्या आत सरसकट पाहणी करून  25% अग्रीम

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

18 Sep 2024, 07:57 वाजता

राज ठाकरेंचा शैक्षणिक धोरणावर सवाल

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना काढल्यानंतर राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. लोकांना अपमानित करणं हेच नवं शैक्षणिक धोरण आहे का असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारला आहे. 

18 Sep 2024, 07:56 वाजता

अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची.. अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी निकाल लागणार का याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

18 Sep 2024, 07:54 वाजता

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस

अंतरवाली सराटीत सहाव्यांदा जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगेंनी हे उपोषण सुरू केल आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, सगे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी, हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे,  दरम्यान,मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिक आहे. सरकारनं सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजानं देखील सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे,असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें व्यक्त केल आहे. मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना जरांगेंनी आता खडतर प्रवास सुरू झाल्याचं म्हटल आहे. त्याचबरोबर संधी दिली आता आरक्षणाची अंमलबजावणी करा असं आवाहनही जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.