Breaking News LIVE: शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसाच्या आत सरसकट पाहणी करून 25% अग्रीम

Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्रातील घडामोडींचे अपडेट एका क्लिकवर. 

Breaking News LIVE: शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसाच्या आत सरसकट पाहणी करून  25% अग्रीम

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

18 Sep 2024, 19:21 वाजता

बीड:अतिवृष्टी मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या सरसकट पाहणी करून 25 टक्के अग्रीम देण्याचा निर्णय

पिकविम्यात काही गैरप्रकार झाला तर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश

कृषी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय

शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसाच्या आत सरसकट पाहणी करून  25% अग्रीम

18 Sep 2024, 18:24 वाजता

महाविकास आघाडीची बैठक संपली, जागा वाटपावर अजूनही चर्चा सुरू

पुढील दोन दिवस जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू राहतील 

मुख्यत्वे करून मुंबईतला ३६ जागांचा जागावाटप जवळपास पूर्ण होत असून ज्या ६-७ जागांवर तिढा आहे अशा जागांवर लवकरच तोडगा काढला जाईल व उर्वरित महाराष्ट्रातल्या जागावाटप वर सुद्धा चर्चा  महाविकास आघाडीचे नेत्यांकडून केली जातीये 

 विधानसभा निवडणुकीसाठी  महाविकास आघाडीचे  जागावाटप करताना  जिंकलेल्या जागा सोडून इतर जागांवर  महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे आणि त्या ठिकाणी कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत  त्यावर सुद्धा चर्चा केली जातीये 
त्यामुळे मेरिटनुसार  महाविकास आघाडीच्या जागावाटप  केलं जात असल्याचं सांगण्यात आलंय 

त्यानुसारच महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्मुला समोर येईल

18 Sep 2024, 17:42 वाजता

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची खेळी...

विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांची महामंडळावर लावणार वर्णी 

विधनपरिषदेसाठी अजित पवार गटात इच्छुकांची रांग लागली आहे, त्यामुळे पक्षात कोणीही नाराज होऊ नये म्हणून महामंडळावर वर्णी लावण्यात येणार आहे 

पक्षात इच्छुकांशी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे चर्चा करत आहे..

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील नाराजी निवडणुकीत डोके दुखी ठरू शकते त्यामुळे ही रणनीती आखली जात आहे...

18 Sep 2024, 17:03 वाजता

बांग्लादेशविरोधातील मालिकेला आदित्य ठाकरेंचा विरोध

बांग्लादेशसोबत क्रिकेट सिरिज सुरू होत आहे.याविषयी मी ट्विट केले सकाळी. मला परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती हवी की,हिंदूंवर बांग्लादेशात अत्याचार झाले की नाही. इथंही त्यामुळं दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला.

केंद्र भाजपचे,बीसीसीआय भाजपचे आता क्रिकेट सामने खेळवत आहे. निवडणूक आली की हे हिंदू मुस्लिम करतात. 

जर बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार होत असतील तर मग त्यांच्यासोबत क्रिकेट सामने का ?

केंद्र सरकारने याविषयी भूमिका स्पष्ट करावी

18 Sep 2024, 16:07 वाजता

23 सप्टेंबर 2024 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक, बैठकीत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा नवीन वेळापत्रकावर चर्चा केली जाणार 

बैठकीतील निर्णयानंतर नवीन वेळापत्रक केले जाणार जाहीर 

22 ऑगस्ट ला झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, मात्र तारीख जाहीर करण्यात आलेली नव्हती 

परीक्षेची सुधारित तारीख लवकरात लवकर जाहीर करावी यासाठी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होत पत्र..

ऑगस्ट २०२४ मध्ये नियोजित असलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या दिवशी IBPS परीक्षा येत असल्याने राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी, या प्रमुख मागणीसाठी पुणे येथे MPSC च्या विद्यार्थांनी ठिय्या आंदोलन केले होत..

18 Sep 2024, 15:17 वाजता

अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

365,192 अंतर्गत गुन्हा दाखल

भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखेडे यांनी केली होती गुन्हा दाखल करण्याची मागणी

अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यशोमती ठाकूर व बळवंत वानखडे यांचा अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात आयुक्तांच्या दालनात केलं होतं आंदोलन

18 Sep 2024, 13:43 वाजता

27 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू 

अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड,केळकर रोड,टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोडवरील मिरवणुका संपल्या नसून अजून 2 ते 3 तास लागण्याची शक्यता 

18 Sep 2024, 13:14 वाजता

नाशिक शहरात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नाशिक शहरात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आई वडिलांसह मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं नाशिक शहर हादरलं आहे. मूळचे गौळणे गावचे मात्र पाथर्डी फाटा परिसरात हे सहाणे कुटुंब राहत होतं. विजय माणिक सहाने, ज्ञानेश्वरी विजय सहाने , अनन्य विजय सहाने अशी तिघांची नावं आहे.. मात्र मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इंदिरानगर पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

18 Sep 2024, 11:54 वाजता

 विसर्जन करताना दोन मुलांचा मृत्यू, नाशिकच्या विसर्जन महोत्सवाला गालबोट 

नाशिकच्या गणेशोत्सवाला गालबोट, विसर्जनानंतर दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वालदेवी नदी पात्रात दोघांचा गणेश विसर्जन करताना मृत्यू झाला आहे. म्हाडा कॉलनीमधील ओंकार गाडे आणि स्वयम मोरे या दोघा युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नदीपात्रात असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात हे दोघे पडले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. 

18 Sep 2024, 11:44 वाजता

नागपूर-अमरावती मार्गांवरून प्रवास कणा-यांसाठी खूशखबर

नागपूरकरांना एक नवा उड्डाणपूल मिळणार आहे. नागपूरहून अमरावतीला जाताना वाडीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विक्रमी वेळेत नागपूर जवळच्या वाडीमध्ये जवळपास अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे.  हा उड्डाणपूल टेस्टिंगच्या उद्दिष्टाने वाहन चालकांसाठी सुरू करण्यात आला आहे.