7 Oct 2024, 19:46 वाजता
मनसेचं मिशन वरळी...
उद्या वरळी मधील नागरिक त्यांच्या विविध प्रश्ना संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थया निवासस्थानी भेट घेतील
वरळी मधील काही नागरिकांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश उद्या होणार आहे
तसेच उद्या सायंकाळी वरळी मधील मनसेच्या दोन शाखांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल
वरळी विधानसभेचे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी नुकताच मनसेमध्ये "वरळी व्हिजन" नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं
वरळी मध्ये विद्यमान आमदार आदित्य ठाकरे विरुद्ध मनसे नेते संदीप देशपांडे अशी लढत होणार आहे
7 Oct 2024, 18:28 वाजता
रुपाली चाकणकर नायर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या
मुंबईतील नायर रुग्णालयात सहयोगी प्राध्यापकाकडून विद्यार्थीनीचा लैंगिक छळ झाल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पश्चिम उपनगरे यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचनिमित्ताने महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर या नायर रुग्णालय येथे अधिष्ठाता आणि रुग्णालय प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेणार आहेत.
7 Oct 2024, 18:27 वाजता
सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगासाठी भाजपकडून पुन्हा प्रयत्न
लोकसभेतील अपयशानंतर भाजपकडून नव्या समीकरणांची चाचपणी
राज्यातील युवा नेत्यांवर समाज एकत्रीकरण आणि समाजाला भाजपकडे खेचून आणण्याची जबाबदारी
विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, आमदार अमित गोरखे यांच्या राज्यात सामाजिक यात्रा
टिळेकर यांच्या हिंदू बहुजन सन्मान यात्रा तर गोरखे यांच्या बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून सामाजिक समीकरणे जुळवण्यावर भाजपचा भर
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडूनही विविध समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठींवर भर
7 Oct 2024, 16:41 वाजता
मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
जेष्ठ चित्रपट,नाट्य कलाकार, अभिनेत्री श्रीमती सुहासिनी तथा सुहास जोशी यांना यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर
5 नोव्हेंबर रंगभूमिदिनी होणार पुरस्काराचे वितरण
नाट्य संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण :
विष्णुदास भावे गौरव पदक, 25 हजार रोख रुपये, शाल श्रीफक असे पुरस्काराचे स्वरूप
7 Oct 2024, 15:14 वाजता
मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटप बाबत बैठक
नाना पटोले, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, अनिल देशमुख बैठकीसाठी दाखल
विदर्भ मराठवाडा आणि खान्देश याबाबत अंतिम चर्चा
भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवारही मविआच्या नेत्यांसोबत
विजय वडेट्टीवार बैठकीसाठी दाखल
7 Oct 2024, 14:21 वाजता
सांगलीच्या तासगावमध्ये आजी-माजी खासदारांमध्ये भरसभेत जुंपली
खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटलांमध्ये भर व्यासपीठावर जोरदार वादा-वादी
संजयकाका पाटील समर्थक खासदार विशाल पाटलांच्या अंगावर गेले धावून.
कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत तासगाव नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी घडला प्रकार
तासगावच्या रिंग रोड मंजुरी प्रकरणावरून संजयकाका आणि विशाल पाटील एकमेकांना भिडले.
7 Oct 2024, 13:48 वाजता
बारामतीत गँग आहे, पण इथे...; शरद पवारांचं जाहीर सभेत विधान
अलीकडच्या काळात इंदापूरच्या राजकारणाला काही लोकांनी वेगळी दिशा दिली. बारामतीत गँग आहे, पण इथे सुद्धा मलिदा गँग असल्याचं आज कळलं. अशा लोकांना पायबंद घालायचा असेल तर ती क्षमता असलेला माणूस पाहिजे. हर्षवर्धन पाटील यांच्यात पोकळी भरून काढण्याची क्षमता आहे, असं शरद पवारांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन यांच्या पक्ष प्रवेशाच्या जाहीर सभेत म्हटलं आहे.
7 Oct 2024, 13:31 वाजता
दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी - सूत्रांची माहिती
दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित यादी जाहीर केली जाईल असं सांगितलं जात आहे. जास्तीत जास्त उमेदवारांचा पहिल्याच यादीत समावेश असण्याची शक्यता आहे. मतभेद आणि तिढा असलेल्या जागांचा तिढा दिल्लीत सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
7 Oct 2024, 12:56 वाजता
मुंबईतील भाजपा आमदारांवर RSS नाराज?
मुंबई भाजपतील काही नेत्यांच्या कार्यशैलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या काही आमदारांच्या कामगिरीवरही संघ नाखूष असल्याचे समजते. मुंबईतील 4 ते 5 विद्यमान आमदारांवर संघ नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'झी 24 तास'ला दिली आहे.
7 Oct 2024, 12:31 वाजता
चंद्रपूर: 12 वर्षीय मुलीबरोबर अश्लील वर्तन; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
चंद्रपूरमधील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातला आरोपी अमोल लोडे याच्याविरोधात नव्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केले होते. उन्हाळ्यात अतीरिक्त शिकवणी घेण्याचे बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून विनयभंग केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाच्या चौकशीदरम्यान पीडित मुलीने ही माहिती दिली असून त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा केला दाखल