Maharashtra Breaking News : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार

Maharashtra Breaking News : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार

Maharashtra Breaking News : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार

Breaking News : राज्यात क्षणाक्षणाला घडणाऱ्या राजकीय आणि इतर प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर. गावखेड्याच्या बातम्या, हवामानाचा अंदाज, केंद्रातील निर्णय आणि बातमी तुमच्या फायद्याची... पाहा Live Blog मध्ये. 

 

17 Jun 2024, 10:36 वाजता

Maharashtra Breaking News Live : नवी मुंबईत लाखो लिटर पाणी वाया 

नवी मुंबई मध्ये एकिकडे पाणीकपात सुरू असून, दुसरीकडे पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी फुकट जात आहे. गोठवली गावात पाण्याची पाईपलाईन फुटून पाणी वाया जात आहे याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. 

17 Jun 2024, 10:17 वाजता

Breaking News Live : पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात 

पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला असून, दार्जिलिंगमधील कंचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनला मालगाडीनं जोरदार धडक दिली आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून, बचावकार्यासाठी तातडीनं बचाव पथकं आणि यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. 

17 Jun 2024, 09:35 वाजता

Maharashtra Breaking News Live : दंगलींबद्दल शिकवल्यास....

राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एनसीईआरटीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नवीन बदलांमध्ये दंगलींबद्दलचे संदर्भ पाठ्यपुस्तकांमधून हटवण्यात आले आहेत. एनसीईआरटीचे संचालक दिनेस प्रसाद सकलानी यांनी या बदलांमागील भूमिका स्पष्ट करताना, 'दंगलींबद्दल शिकवल्यास हिंसक व वैफलग्रस्त नागरिक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आम्ही शालेय पाठ्यपुस्तकातील गुजरात दंगल, बाबरी मशीदीबद्दलचे संदर्भ सुधारले आहेत,' असं म्हटलं आहे.

17 Jun 2024, 09:33 वाजता

Maharashtra Breaking News Live : नाशिकमध्ये भीषण दुर्घटना; नियंत्रण सुटल्याने कार थेट गोदापत्रात

नाशिकच्या गोदाघाटावर चार चाकी वाहनांची वर्दळ नेहमीच असते.. सुटीचा दिवस असल्याने रविवारही मोठी गर्दी होती. गोदाघाटा परिसरात असलेल्या रोकडोबा पटांगणावर चारचाकी वाहनाचा ब्रेक न लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट गोदापात्रेत गेले. यामुळे वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. या वेळी बघ्यांची गर्दी झाली होती. यात जीवित हानी झाली नाहीये. गाडी पाण्यात असणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

17 Jun 2024, 09:23 वाजता

Maharashtra Breaking News Live : पुण्यात पावसाचा ब्रेक 

पुणे पुण्यात पावसाने मोठा ब्रेक दिला आहे 9 जूनला पुण्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली होती. मात्र 8 दिवसानंतरही पुणे शहरात पाऊस बरसला नाही. पावसाची साधारण सरासरी अवकळी पावसानेच भरून काढल्याच म्हंटल जातंय कारण 4 ते 8 जूनपर्यंत 230 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र मॉन्सून आगमनापासून पाऊस बंदच आहे. 
मागच्या वर्षी शहरात मान्सून 25 जूनला दाखल झाला होता.

17 Jun 2024, 09:02 वाजता

Maharashtra Breaking News Live : बार - पब मध्ये दाखवावा लागणार वयाचा पुरावा 

पुणे पोर्श कार अपघात प्रकारानंतर आता बार - पब मध्ये वयाचा पुरावा म्हणून मागितले जाणार सरकारी ओळखपत्र. अल्पवयीन मुलांना प्रवेश मिळू नये यासाठीए आता प्रवेश द्वारावरच ओळखपत्र तपासला जाणार आहे. वाईन बियर पिण्यासाठी 21 वर्ष वय तर दारू पिण्यासाठी 28 वर्ष वय असणे बंधनकारक आहे. त्यासाठी आता अनेक दुकानांनी ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारू न देण्याचा निर्णय घेतला आहे. 

17 Jun 2024, 08:39 वाजता

Maharashtra Breaking News Live : बकरी ईदनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल 

बकरी ईदनिमित्त पुण्यातील गोळीबार चौक परिसरात वाहतुकीत आज बदल करण्यात आले आहेत. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक ,ढोले पाटील चौक या मार्गावरून वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्यात आली आहे. 

17 Jun 2024, 08:22 वाजता

Maharashtra Breaking News Live : पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करणारे आरोपी किती निगरगट्ट

अपघाताच्या माध्यमातून पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करणारे आरोपी किती निगरगट्ट आणि असंवेदनशील होते,हत्या केल्यानंतर त्यांनी पार्टी केल्याचे फोटो समोर आले. पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांचा जीव घेणारा नीरज निमजे आणि त्याच वेळेस दुचाकीने पाठलाग करत संपूर्ण घटनेवर नजर ठेवणारा सचिन धार्मिक हे दोघेही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्यानंतर नागपूरच्या एका हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले होते... त्या ठिकाणी दोघांनी मद्यप्राशन केले. 

17 Jun 2024, 07:56 वाजता

Maharashtra Breaking News Live : मुंबईत ढगाळ वातावरण 

मुंबईत आज पहाटेपासून ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतल्या काही ठिकाणी पहाटे हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. शहरात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवस पाऊस पडला आणि त्यानंतर पुन्हा पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मराठवाडा, कोकण विभागात मध्या महाराष्ट्र्र तुरळक पावसाची शक्यता शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19-20 जून रोजी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तुरळक पाऊस तर 18-20 जून रोजी काही भागात येलो अलर्ट दिला आहे. 

 

17 Jun 2024, 07:52 वाजता

Maharashtra Breaking News Live : शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन.

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथे नमाज पठण केली जाते, मात्र यावेळी हिंदू बांधव भगिनींना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही. त्याच्या निषेधार्थ शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन करत आहेत. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट एकत्र येणार असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय