Maharashtra Breaking News : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार

Maharashtra Breaking News : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार

Maharashtra Breaking News : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार

Breaking News : राज्यात क्षणाक्षणाला घडणाऱ्या राजकीय आणि इतर प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर. गावखेड्याच्या बातम्या, हवामानाचा अंदाज, केंद्रातील निर्णय आणि बातमी तुमच्या फायद्याची... पाहा Live Blog मध्ये. 

 

17 Jun 2024, 19:41 वाजता

 प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.. वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत.. राहुल गांधी हे वायनाड तसंच रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.. मात्र राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय. आता राहुल गांधींऐवजी वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत.. 

17 Jun 2024, 18:36 वाजता

छगन भुजबळांसंदर्भातली.. मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा आता सुरु झालीय. कारण मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनीच तसा सूर बोलून दाखवलाय.  
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.... मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप 

17 Jun 2024, 14:58 वाजता

Maharashtra Breaking News Live  -  'अमोल किर्तीकरांचा पराभव संशयास्पद'

अमोल किर्तीकरांचा पराभव संशयास्पद आहे. आम्ही कोर्टात जात आहोतच. निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासला गेलाय19 व्या फेरीनंतर पारदर्शकता बंद झाली. प्रत्येक फेरीनंतर मते सांगितली जातात. पण नंतर हे झाले नाही, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. निकाल एकतर्फी जाहीर केला गेला. RO यांना कुणाचे फोन येत होते. वारंवार बाथरूमला जावून त्या कुणाशी बोलत होत्या. सीसीटीव्हीची मागणी आम्ही केली. ते देतो म्हणून सांगूनही नाकारले आहे. जर पारदर्शकता आहे तर ते द्यायला काय हरकत आहे असंही ठाकरे गटाने केलीय.

17 Jun 2024, 13:47 वाजता

Maharashtra Breaking News Live : मुंबईत रहिवासी इमारतीला आग 

मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. इथं तीन मजली इमारतीला लागली आग लागल्याची माहिती असून, तातडीनं चार फायर इंजिन आणि तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले आणि आज विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. 

17 Jun 2024, 13:29 वाजता

Maharashtra Breaking News Live : त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत होणार सुधारणा

त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षारक्षकांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा भाविकांचा आरोप केल्यानंतर, झी 24 चोवीस तासच्या बातमीनंतर प्रशासनानं सदर प्रकरणी दखल घेतली आहे. ज्या धर्तीवर आता  भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत होणार सुधारणा होणार आहेत. पोलीस अधिकारी त्र्यंबकेश्वर मंदिरात मारहाणीसंदर्भात सीसीटीव्हीची पाहणी माहिती करुन घेत पुढील कारवाई केली. 

17 Jun 2024, 13:20 वाजता

Maharashtra Breaking News Live : विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल

रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आत्ता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल. विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. भारतीय दंडसंविधानाअन्वये 188 आणि 128 (2) लोकप्रतिनिधित्व अधिनियम सह 54 निवडणूक नियमांचे नियम अंतर्गत त्यांच्या नावे गुन्हा दाखल. 

17 Jun 2024, 12:59 वाजता

Maharashtra Breaking News Live : आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्श कार अपघात पुनरावृत्ती..?

आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघात पुनरावृत्ती..? अल्पवयीन कार चालकाकडुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न. समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पुर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकाना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा थरार कँमेरात कैद झाला. हा अपघाताचा थरार झाल्यानंतर हा तरुण कारच्या छतावर बसुन शिवीगाळ करत होता. पुर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याबाबत आळंदी पोलीसांत फिर्याद देण्यात आली. 

17 Jun 2024, 12:32 वाजता

Maharashtra Breaking News Live : कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर 

लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितल त्यामुळे संजय राऊत, विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या. कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमचा कोकणी माणूस कधीही कोणाजवळ कर्ज मागत नाही. घेतलेले कर्ज त्वरित फेडतो. आमच्या कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर आमची जनता त्यांना गाडून टाकेल, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखावर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. 

17 Jun 2024, 11:08 वाजता

Maharashtra Breaking News Live : मुंबईत दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा लावली हजेरी 

मुंबई शहर आणि उपनगरात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा लावली हजेरी. उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर अखेर तृप्त झाले आहेत. ढगाळ वातावरणासह शहरातील हवेत गारवा पसरला असून, सध्यातरी द्रुतगती मार्गासह रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत नाही. 

17 Jun 2024, 10:58 वाजता

Maharashtra Breaking News Live : जुलै महिन्यात इंग्लंड येथून वाघनखं साताऱ्यात येणार

शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. छत्रपतीं शिवाजीं महाराजांच्या पराक्रमाची ग्वाही देणारी वाघनख पुन्हा इंग्लंडमधून भारतात आणली जाणार आहेत. ही वाघनखं जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. तब्बल दहा महिने ही वाघनखं या संग्रहालयात ठेवली जाणार.  या वाघनखांच्या सुरक्षेसाठी विविध यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.