Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेवर रुग्णालयात उपचार सुरु

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा आजच्या या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात  

Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेवर रुग्णालयात उपचार सुरु

Maharashtra Breaking News LIVE: आज राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. तर, एकीकडे मराठा आरक्षणावरुन राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तर, राज्यात विधानसभा निवडणूकांपूर्वीच घडामोडींना वेग आले आहेत. राज्यातील व देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

23 Sep 2024, 08:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  'नाना पटोले यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही तर हिसकावून घेऊ'

एकीकडे महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेऊ असे सांगत असले तरी नागपुरात मात्र काँग्रेस नेते चांगलेचं आक्रमक झालेय आहे. नाना पटोले यांनी मेहनत घेतली त्यांना बक्षीस मिळाल पाहिजे. नाही मिळालं तर ते हिसकावून घेऊ असा इशारा देत नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार आक्रमक भूमिका घेतली.

23 Sep 2024, 08:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: २०१२ च्या पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनीब इक्बाल मेमन याला जामीन

२०१२ च्या पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनीब इक्बाल मेमन याला जामीन देण्यात आला आहे. मुंबईउच्च न्यायालयाने शुक्रवारी जामिनावर सुटका केली असून मुनीब गेली १२ वर्षे तुरुंगात होता
उच्च न्यायालयाने त्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष न्यायालयाने मेमन याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर मेमन याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने त्याला दिलासा दिला