Chandrayaan 3 Moon Crater : लहान मुलांच्या गोष्टीतील चंदा मामा, कवींच्या कल्पेनेतील चंद्रमा आणि प्रत्येकाला आकर्षित करणारा चंद्र... संशोधकांसाठी देखील कुतूहलचा विषय आहे. जगभरातील अनेक देश चंद्राबाबत संशोधन करत आहे. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने तर यशस्वी टप्पा गाठला आहे चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून अत्यंत महत्वाचा डेटा पाठवला आहे. यामुळे चंद्राची निर्मीती कशी झाली या सर्वात मोठा रहस्याचा लवकरच उलगडा होण्यास मदत होणार आहे.
प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर 160 किलोमीटर व्यासाचा एक नवीन खड्डा शोधला आहे. दक्षिण ध्रुवाजवळील अटकिन बेसिनपासून जवळपास 350 किमी अंतरावर असलेल्या उंच भागाजवळच हा खड्डा आहे. लँडिंगनंतर चंद्रावर भ्रण करताना प्रज्ञान रोव्हरने हा खड्डा शोधला होता. प्रज्ञान रोव्हरच्या नेव्हिगेशन आणि हाय रिझोल्युशन कॅमेऱ्यांच्या मदतीने डेटा गोळा केला होता. या डेटाच्या अभ्यातून या विवराची रचना उघड झाली आहे. अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञांनी या डेटाचे विश्लेषण करुन नव्या संशोधनबाबातचा आहवाल विज्ञान डायरेक्टच्या नवीन अंकात प्रकाशित केला आहे.
चंद्रावरील 160 किलोमीटर व्यासाच्या खड्ड्यासह दक्षिण ध्रुवाजवळील अटकिन बेसिनजवळ 1,400 मीटर मलबा आढळला आहे. 160 किलोमीटर व्यासाचा हा खड्डा अटकिन बेसिनच्या निर्मीती पूर्वीचा असावा असा संशोधकांचा दावा आहे. प्रज्ञान रोव्हरने गोळा केलेल्या डेटाच्या मदतीने नवीन स्तरातील धूळ आणि खडकांची संरचना यांच्या मदतीने चंद्राच्या सुरुवातीच्या भूगर्भशास्त्रीय उत्क्रांती समजून घेण्यास मदत होणार आहे. तसेच चंद्राची निर्मीती कशी झाली याचा उलगडा होण्यास देखील मदत होणार आहे. चंद्र मोहिमेतील हे सर्वात मोठे संशोधन मानले जात आहे.
14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. चांद्रयान 3 चा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने गोळा केला आहे.