Breaking News LIVE UPDATES :वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जण ताब्यात, ताम्हिणी घाटात केली कारवाई

Breaking News LIVE UPDATES : राज्यासह देशातही कुठे काय घडतंय? राजकीय वर्तुळा कोणाची हवा? पाहा बातम्यांचा लाईव्ह ब्लॉग...   

Breaking News LIVE UPDATES :वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जण ताब्यात, ताम्हिणी घाटात केली कारवाई

Breaking News LIVE UPDATES : हवामानाच्या स्थितीपासून महागाई आणि राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील बातम्या आणि स्थानिक घडामोडींसह देशभरातील महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर. 

3 Sep 2024, 19:54 वाजता

वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जणांना घेतलं ताब्यात

वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जणांना ताम्हिणी घाटातून घेतलं ताब्यात 

पुणे क्राईम ब्रँच आणि रायगड पोलिसांच्या मदतीने 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे

जेवण्यासाठी हे सगळे जणं ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते

जेवण झाल्यानंतर तामिनी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना घेतलं ताब्यात 

दोन दिवसांपूर्वी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने करण्यात आला होता हल्ला

3 Sep 2024, 18:42 वाजता

समरजीत घाटगेंचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, कमळ सोडून फुंकली तुतारी

3 Sep 2024, 18:41 वाजता

कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यावर FIR दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले गेले आहेत. तसेच या घटनेचे पुराव्यासाठी चित्रिकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

3 Sep 2024, 17:58 वाजता

अमृत भारत स्टेशन अंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार 

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या स्टेशन डेव्हलप आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहेत

अमृत भारत स्टेशन अंतर्गत राज्यातील 132 रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे.

यामध्ये सर्वात अधिक खर्च  म्हणजे  1813  कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा कायापालट करण्यासाठी केला जाणार आहे.

त्या संदर्भातील फोटो आणि माहिती केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून उपलब्ध झाली आहे

3 Sep 2024, 17:37 वाजता

पंप स्टोरेजचे राज्यात विक्रमी करार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

आज एकूण 35,240 मे.वॉ.चे वीजनिर्मिती करार.
यात एकूण गुंतवणूक : 1,88,750 कोटी रुपये
रोजगार निर्माण : 62,550

आतापर्यंत एकूण पंप स्टोरेजचे करार: 40,870 मे.वॉ.
एकूण गुंतवणूक : 2,13,381 कोटी रुपये
एकूण रोजगारनिर्मिती : 71,950

राज्याची एकूण स्थापित क्षमता : 46,000 मे.वॉ.
त्यातून 40,870 मे.वॉ.चे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठे पाऊल.
यापूर्वीही राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत सुद्धा लक्षणीय पुढाकार.
ऐतिहासिक पाऊल : 2030 पर्यंत राज्यातील 50 टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक साधनांतून होणार.

आज जे करार झाले, त्यात एनटीपीसी, वेल्सपुन न्यू एनर्जी लि, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो, टीएचडीसीआयएल आणि अदानी पॉवरचा समावेश.

3 Sep 2024, 17:10 वाजता

मुंबई गोवा महामार्गावरून 5 सप्टेंबर पासून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी. गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश.

3 Sep 2024, 16:31 वाजता

आदित्य ठाकरेंनी घेतली आयुक्तांची भेट

आयुक्तांची आज भेट घेतली मागच्या वेळेस वरळीतील आणि इतर विषय होते आज देखील महत्त्वाचे तीन विषय होते... जे मागच्या वेळी जे प्रश्न मांडले होते ते विषय त्यांनी तातडीने सोडवायला घेतल्या त्यामुळे मी त्यांचे आभार देखील मानायला आलो होतो... डीलाय रोडचा ब्रिज असेल किंवा वरळी स्मशानभूमीचा प्रश्न असेल तो देखील त्यांनी सोडवायला घेतला आहे...

आजचे तीन महत्त्वाचे विषय होते महानगरपालिकेच्या वतीने लिपिक पदासाठी भरती काढली आहे त्याच्यामध्ये दोन-तीन जाचकाठी ठेवल्या आहेत त्या शिथिल करावे अशी विनंती आम्ही केली आहे... कुलाबा मधील मुंबादेवी मंदिर याच्या मागे जी जागा आहे ती पार्किंग बांधणे सुरू केला आहे... त्यात तिथे पार्किंग आहे ती हलवून तिथे भक्त निवास झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे... तिथे कचऱ्याचा मोठा ढिगारा झाला आहे... तू तिथून बाजूला झाला पाहिजे कारण येता नवरात्र मध्ये तिथे मोठ्या प्रमाणात भंडारा लागतो त्याला अडचण होऊ शकते म्हणून हा निघाला बाजूला काढावा...

3 Sep 2024, 15:01 वाजता

एसटी संपावर कोणताही तोडगा नाहीच

 

उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतील बैठक निष्फळ, सूत्रांची माहिती 

एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नाही 

ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको यासाठी उदय सामंत यांनी केली विनंती 
मात्र जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संपावर ठाम अशी एसटी कर्मचारी संघटनांची भूमिका 

कृती समितीकडून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार 

उद्या संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष

3 Sep 2024, 14:09 वाजता

पुढील २४ तासांसाठी कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

3 Sep 2024, 14:07 वाजता

एसटी कर्मचारी समिती आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची बैठक

एसटी कर्मचारी संघटनेची कृती समिती आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात बैठकीला सुरुवात

कृती समितीकडून बैठकीत विविध मागण्या ठेवण्यात येणार

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे ही प्रमुख मागणी

एक्सप्रेस टावरमधील एमआयडीसीच्या कार्यालयात बैठकीला सुरुवात