Breaking News LIVE UPDATES :वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जण ताब्यात, ताम्हिणी घाटात केली कारवाई

Breaking News LIVE UPDATES : राज्यासह देशातही कुठे काय घडतंय? राजकीय वर्तुळा कोणाची हवा? पाहा बातम्यांचा लाईव्ह ब्लॉग...   

Breaking News LIVE UPDATES :वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जण ताब्यात, ताम्हिणी घाटात केली कारवाई

Breaking News LIVE UPDATES : हवामानाच्या स्थितीपासून महागाई आणि राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील बातम्या आणि स्थानिक घडामोडींसह देशभरातील महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर. 

3 Sep 2024, 12:30 वाजता

Breaking News LIVE UPDATES : कोल्हापुरात पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड

भाजपचा ग्रामीण  जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई शरद पवारांच्या भेटीला. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईसुद्धा इच्छुक. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचा दुसरा मोहरा देखील शरद पवारांच्या गळाला? जिल्ह्यात एकच चर्चा. राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई याचे चिरंजीव. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याची एकत्रित घेतली भेट. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून  अजित पवार गटाचे के पी पाटील, ए वाय पाटील यांच्या नंतर आता राहुल देसाई हेही शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक.

3 Sep 2024, 12:28 वाजता

Breaking News LIVE UPDATES : जयदीप आपटेला लूक आऊट नोटीस

जयदीप आपटेला लूक आऊट नोटीस.  राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे.गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत,मात्र त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्या विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील कोसललेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार असून त्याचा पोलिसांना ठावठिकाणा लागला नाही. जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथके तयार केली आहेत. त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना केली आहेत. परंतु अजूनही जयदीप आपटे सापडत नाही आहे. बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. तो सध्या ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे. परंतु जयदीप आपटे फरार आहे.

3 Sep 2024, 12:04 वाजता

Breaking News LIVE UPDATES : स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात करणार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात करणार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश. सिद्धार्थ खरात यांनी 1 जुलै रोजी मंत्रालयीन सहसचिव असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि त्यानंतर आता त्यांनी राजकारणात येण्याचा मार्ग स्वीकारला. मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या ठिकाणी दुपारी एक वाजता  सिद्धार्थ खरात ही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मेहकर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ खरात  हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग , ग्राम विकास विभाग , गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले असून राज्यमंत्री , कॅबीनेट मंत्री व केंद्रीय राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून कामे केली आहेत. 

3 Sep 2024, 11:49 वाजता

Breaking News LIVE UPDATES : आता गणपतीनंतरच सर्वकाही; मविआत मोठा निर्णय 

इथं जागावाटपाची समीकरणं अद्यापही अनुत्तरित असतानाच आता महाविकास आघाडीच्या जागावाटप संदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईच्या रखडलेल्या जागावाटपसंदर्भात आता गणेशोत्सवानंतर निर्णय होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या  जागावाटपसंदर्भातील  दोन बैठका झाल्यानंतर आता पुढील बैठका या गणेशोत्सवानंतर होणार असल्याची सूत्रांची माहिती. गणेशोत्सव झाल्यानंतर  सुरुवातीला मुंबईतील जागावाटपा संदर्भात निर्णय घेतला जाणार असून त्यानंतर कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील जागा वाटप बाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

3 Sep 2024, 11:28 वाजता

Breaking News LIVE UPDATES : एसटी महामंडळाच्या कामगार संघनटनेशी मुख्यमंत्री करणार चर्चा 

ऐन सणवारांच्या दिवसांमध्ये एसटी महामंडळानं विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या धर्तीवर अखेर शासनाकडूनही एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. अधिकृत माहितीनुसार 4 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीला त्यांच्या मागण्यांबाबत बैठकीस बोलावलं आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.

3 Sep 2024, 11:17 वाजता

Breaking News LIVE UPDATES : शिक्षकाने मुलीची छेड काढल्याचा आरोप, नातेवाईकांनी केली क्लासेसची तोडफोड 

नांदेड शहरातील एका खाजगी कोचिंग मध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीची शिक्षकाने छेड काढल्याचा प्रकार नांदेड शहरात घडला असून संतप्त नातेवाईकांनी कोचिंग क्लासेसची तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणात शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी नागेश जाधव असे शिक्षकाचे नाव असून भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीये. चैतन्य नगर परिसरातील कॅनॉल रोडवर खाजगी क्लासेस आहे. इयत्ता अकरावी मध्ये शिकणारी मुलगी या क्लासेसमध्ये स्पोकन इंग्लिश शिकत होती. मुलीला पेपर देण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्ये बोलवून शिक्षकाने विनयभंग केला अशी तक्रार मुलीने केलीये. पोलिसांनी फिर्यादी मुलीचा जबाब घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विनयभंग, पाक्सो आणि एट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आलाय

3 Sep 2024, 11:13 वाजता

Breaking News LIVE UPDATES : लालपरी संपावर! काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन.
  • 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी देणे बाबत.
  • शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करावी.
  • 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्यावी.
  • 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी द्यावी 

3 Sep 2024, 10:21 वाजता

Breaking News LIVE UPDATES : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

राजकीय वर्तुळा अनेकांचं लक्ष लागून राहिलेली शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आणखी लांबणीवर पडली आहे. मंगळवारी होणारी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता ही सुनावणी गुरुवारी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे, सरन्यायाधीश उपस्थित नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलल्याचं कारण समोर येत आहे. 

3 Sep 2024, 10:04 वाजता

Breaking News LIVE UPDATES : शिर्डी एसटी डेपोतील कर्मचारी संपावर 

राज्यातील एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेलेत. वेतनवाढीच्या मागणीसह खाजगीकरण बंदीसह विविध मागण्याकरिता ST कर्मचरी संपावर गेले आहेत. त्यामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविक प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

3 Sep 2024, 10:02 वाजता

Breaking News LIVE UPDATES : गुहागर, दापोली, खेड डेपो शंभर टक्के बंद; ST कामगारांचं आंदोलन गंभीर वळणावर 

कोकणात देखील एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अनेक भागात प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसतायत. सकाळपासून बस डेपो मधून गाड्या न सुटल्यामुळे विद्यार्थ्यांचेही हाल होताना दिसतायत. गुहागर ,दापोली, खेड डेपोमध्ये शंभर टक्के बंद असल्याचे पाहायला मिळतंय तर चिपळूण मध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.