Breaking News LIVE UPDATES : हवामानाच्या स्थितीपासून महागाई आणि राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील बातम्या आणि स्थानिक घडामोडींसह देशभरातील महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर.
3 Sep 2024, 09:15 वाजता
Breaking News LIVE UPDATES : स्वारगेट बस स्थानकात बाहेरगावी जाणाऱ्या सर्व बस बंद
स्वारगेट बस स्थानकातून बाहेर गावी जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद. नाईटसाठी आलेल्या बस फक्त बाहेर पडणार असल्याची माहिती. ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉपमधील जवळपास 500 च्या वर कर्मचारी संपात सहभागी होणार. स्वारगेट बस स्थानकात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
3 Sep 2024, 08:36 वाजता
Breaking News LIVE UPDATES : खा. धैर्यशील पाटील, जयंत पाटील यांच्यात वादाची ठिणगी
शेतकरी कामगार पक्ष सोडून भाजपमध्ये जावून नुकतेच राज्यसभेचे खासदार झालेले धैर्यशील पाटील यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना चांगलंच डिवचलय. आपले 24 सदस्य असताना ज्यांनी 12 सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिलं, ज्यांना 12 अधिक की 24 अधिक हे कळलं नाही त्यांनी माझ्या खासदारकीची काळजी करू नये, असा टोला धैर्यशील पाटील यांनी लगावलाय. धैर्यशील पाटलांची खासदारकी अवघ्या 17 महिन्याची आहे असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना माझी खासदारकी 2 वर्षांची आहे या काळात असं काम करीन की मीच धैर्यशीलला भाजप मध्ये पाठवलं असं तुम्ही म्हणाल, अशी कोपरखळी खासदार पाटील यांनी लगावलीय.
3 Sep 2024, 08:31 वाजता
Breaking News LIVE UPDATES : ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांची संपाची हाक
ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच जुलै 2018 ते जानेवारी 2024 या काळातील महागाई भत्ता देण्यात यावा या आणि अशा विविध मागण्यांसाठी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ST कर्मचारी संघटनाकडून काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पहिला दिवस आहे. मुंबई सेंटर येथील ST बस डेपो मध्ये या आंदोलनाचा थेट फटका प्रवाशांवर होताना पाहायला मिळत आहे.
3 Sep 2024, 08:29 वाजता
Breaking News LIVE UPDATES : राष्ट्रवादीत खलबतं; कोण सोडणार पक्ष? पाहा मोठी बातमी
अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील शरद पवारांच्या भेटीला. के पी पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक. उमेदवारी मिळत असेल तरच शरद पवार राष्ट्रवादी पक्षात के.पी पाटील प्रवेश करण्याची शक्यता. के पी पाटलांचे मेहुणे ए वाय पाटील हे देखील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक.
3 Sep 2024, 07:38 वाजता
Breaking News LIVE UPDATES : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 23 ऑक्टोबरपासून
मुंबई विद्यापीठाने द्वितीय सत्रांतर्गत (हिवाळी सत्र 2024) घेतल्या जाणाऱ्या चारही विद्याशाखा अंतर्गतच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच अभियांत्रिकी, वास्तुकला, फार्मसी आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक हे मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
3 Sep 2024, 07:36 वाजता
Breaking News LIVE UPDATES : मुंबईतील पाणीसाठा 97 टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
जुलै महिन्यातील दमदार पाऊस आणि ऑगस्ट महिन्यात अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या पाणीसाठ्यात यंदा भरघोस वाढ झाली असून सात धरणात मिळून ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
3 Sep 2024, 06:32 वाजता
Breaking News LIVE UPDATES : पुणे फ्लॅश वनराज आंदेकर खून प्रकरणात पाच जणांना अटक
पुणे फ्लॅश वनराज आंदेकर खून प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून, गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडही गजाआड. या प्रकरणात आंदेकर यांच्या मेहुना जयंत कोमकार आणि गणेश कोमकार यांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, तर या खून प्रकरणात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
3 Sep 2024, 06:30 वाजता
Breaking News LIVE UPDATES : अबब..... कोथिंबीर 450 रुपये प्रति जुडी
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रात्री झालेल्या लिलावात चक्क कोथंबरीला प्रतिजुडी 450 भाव मिळालाय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे कोथिंबीरीला एवढा भाव मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची सतत धार सुरू आहे. काल सकाळपासूनच नाशिक शहरा सह जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू होती आणि यामुळे अनेक पालेभाज्या खराब झाल्या तर काही भाजीपाला बाजार समितीत पोहोचलाच नाही.