Maharashtra Breaking News LIVE: दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर 

 Maharashtra Breaking News LIVE: दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Breaking News LIVE: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. तसंच, राज्यात पावसाचा जोरही वाढला आहे. बाप्पाच्या आगमनाचीही तयारी जोरात सुरू आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह ब्लॉगमधून 

5 Sep 2024, 19:48 वाजता

दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठीच्या प्रकल्पाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिमी वाहिनी आणि उल्हास खोऱ्यातील वाहून जाणारे 55 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार आहे. तसेच वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या डीपीआरसाठी ६१.५२ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. 

5 Sep 2024, 19:44 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीत वाद 

राज्य सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीत वाद सुरु झाला आहे. अजित पवार गटाने केलेल्या जाहिरातीवर शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

5 Sep 2024, 19:14 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:   लालबागचा राजा फर्स्ट लूक 

5 Sep 2024, 19:11 वाजता

बदलापूर रेल्वे स्थानकात ऐन गर्दीच्यावेळी गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपीने एका व्यक्तीवर गोळीबार करत त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. ऐन गर्दीच्यावेळी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

5 Sep 2024, 18:36 वाजता

ऐन गणेशोत्सव काळात रायगडमध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. काल रात्रीपासूनच सी एन जी चा तुटवडा आहे. वाहतूक कोंडीमुळे  सीएनजी घेवून येणारी वाहने वेळेत पोहोचू शकली नाहीत. यामुळे माणगाव ते खेड पर्यंत सर्वच सी एन जी केंद्रांवर खडखडाट आहे. 

5 Sep 2024, 18:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय 

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांची गैरसोय. रायगडमध्ये काल रात्रीपासून CNG संपल्याने चाकरमान्यांना मनस्ताप. वाहतूक कोंडीमुळे CNG घेवून येणारी वाहने वेळेत पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे माणगाव ते खेड पर्यंत सर्वच CNG केंद्रांवर खडखडाट. 

5 Sep 2024, 18:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण वर्षभराची आर्थिक तरतूद : एकनाथ शिंदे

लाडकी बहीण योजने बंद करण्यासाठी विरोधकांनी कितीही प्रयत्न केला किंवा खोट्या अफवा पसरवल्या आणि कुठेही कोर्टात गेले तरीसुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

5 Sep 2024, 18:15 वाजता

मुंबईतील माजी नगरसेविका ऋतुजा तारे यांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेविका ऋतुजा तारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. 

5 Sep 2024, 16:32 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण

दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचे जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी  होणार आहे. 

5 Sep 2024, 15:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर शिल्पकार जयदीप आपटे याला काल पोलिसांनी अटक केली आहे. आता जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.