Maharashtra Breaking News LIVE: दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर 

 Maharashtra Breaking News LIVE: दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Breaking News LIVE: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. तसंच, राज्यात पावसाचा जोरही वाढला आहे. बाप्पाच्या आगमनाचीही तयारी जोरात सुरू आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह ब्लॉगमधून 

5 Sep 2024, 15:16 वाजता

भरधाव खासगी बस ट्रकला धडकून हॉटेलमध्ये घुसली, 4 जणांचा मृत्यू 

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात भरधाव ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार ठार झाले असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहे. उमरेड-भिवापूर मार्गावर तास गावातील बसस्टॅन्ड जवळ हा अपघात झाला आहे.

5 Sep 2024, 13:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राहुल गांधी यांच्या हस्ते पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे अनावरण

स्वर्गीय पतंगराव कदम लोकतीर्थ स्मारक उदघाटन सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी सांगलीत आले आहेत. आज राहुल गांधी यांच्या हस्ते पंतगराव कदम यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले आहे. 

5 Sep 2024, 13:25 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणः अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ

दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने एसआयटीच्या पथकाने  अक्षयचा मोबाईल मिळत नसल्याचे सांगत  दोन दिवसाची एसआयटीच्या कोठडी देण्याची विनंती केली होती या नंतर कल्याण स्पेशल कोर्टाने अक्षयला दोन दिवसांची कोठडी सुनावली होती. आज ती कोठडी पूर्ण होत असून  त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ झाली आहे. 

5 Sep 2024, 13:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: एसटीची वाट पाहत बसलेल्या दोन शाळकरी मुलांचे अपहरण

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात तर चक्क शाळेत गेलेली मुलं एसटी बंद असल्याने हरवल्याचा प्रकार घडला आहे. येवला तालुक्यातील राजापूर जवळ असलेल्या भवरी येथील चेतन वसंत गायकवाड व कार्तिक संभाजी गायकवाड हे दोन शाळकरी मुले बेपत्ता झाली आहे. भवरि येथून राजापूर येथील शाळेत जाण्यासाठी घरून निघाली होती. मात्र एसटीचा संप असल्याने एका अज्ञात वाहनाने त्यांना गाडीत बसून घेत राजापूर येथे न थांबता थेट नगर जिल्ह्यात राहुरी येथे घेऊन गेले.

5 Sep 2024, 12:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अटल सेतूवरून 35 वर्षीय तरुणांची आत्महत्या, तिसरी  आत्महत्या

 पुण्यातील एका 35 वर्षीय बँकरने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेय

5 Sep 2024, 11:25 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन

राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांचे व्हेरायटी चौक नागपूर येथे आंदोलन सुरु आहे.

5 Sep 2024, 11:24 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

कडेगाव येथील राहुल गांधी यांच्या दौऱ्यात राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हाके व त्यांचे समर्थक आज कडेगाव येथे राहुल गांधी यांच्या दौऱ्यात गांधी यांना काळे झेंडे दाखवणार होते.

5 Sep 2024, 11:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: हिंगोली जिल्ह्यात शेती पिकांचे अतोनात नुकसान

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसाने शेतीच मोठ नुकसान झालय, हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांच्या सुपीक शेतात अक्षरशः भल्ली मोठी दगड वाहून आलीयेत

5 Sep 2024, 10:41 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: जयदीप आपटेला मालवण पोलिस स्थानकात आणले

जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलीस कल्याणवरून ताब्यात घेऊन मालवण पोलीस स्थानकात दाखल

5 Sep 2024, 10:28 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन बसचा अपघात

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन बस कंटेनर वर धडकल्या आहेत. कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे प्रवाशांनी फुल भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या आहेत. सुदैवाने कोणतीही दुखापत नसून दोन्ही बसचे मात्र नुकसान झाले आहे. या दोन्ही बसमध्ये एकूण 80 प्रवासी होते.