Maharashtra Breaking News LIVE: दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर 

 Maharashtra Breaking News LIVE: दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Breaking News LIVE: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. तसंच, राज्यात पावसाचा जोरही वाढला आहे. बाप्पाच्या आगमनाचीही तयारी जोरात सुरू आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह ब्लॉगमधून 

5 Sep 2024, 10:27 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  कोयना धरणातून विसर्ग वाढणार

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने धरणाच्या सहा वक्र दरवाजे 4 फुटांपर्यंत उघडून 37,500 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे.धरणाचा पायथा वीज गृहातुन 2100 क्युसेक सुरू असून कोयना नदी पात्रता एकूण 39600 क्युसेक विसर्ग होत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

5 Sep 2024, 10:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. खासदार वसंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले होते.

5 Sep 2024, 09:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात गणेशोत्सवात चोख बंदोबस्त सात हजार पोलिस असणार तैनात 

गणेशोत्सवाच्या कालावधीत अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.सुमारे सात हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. 

5 Sep 2024, 09:39 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: सोन्याची तस्करी करणारे दोघे नागपूर विमानतळावर अटक, 61 लाखांचे सोने जप्त 

नागपूर विमानतळावर 61 लाख किमतीचे सोने जप्त दोघांना अटक.  सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम युनिटची कारवाई

5 Sep 2024, 09:38 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांगली जिल्हा दौऱ्यावर 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तिन्ही मतदारसंघात काँग्रेसच्या विचाराची उमेदवार निवडून आल्याने राहुल गांधी आजच्या दौऱ्यात कशा प्रकारचे भाषण करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

5 Sep 2024, 09:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: सलग दुसऱ्या दिवशी ठाणे शहरात वाहतूककोंडी

सलग दुसऱ्या दिवशी ठाणे शहरात वाहतूककोंडी आहे.   घोडबंदरवरून ठाणे गाठायला तब्बल 3 तास लागत आहेत. ठाण्यामधे सलग दुसऱ्या दिवशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी आहे. माजिवडा, घोडबंदर रोडवरून ठाणे शहराच्या दिशेेने तुफान कोंडी झालीय.

5 Sep 2024, 08:52 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: ग्रेटा थनबर्गला अटक, कोपनहेगन पोलिसांची कारवाई

स्वीडनमधील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्गला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भातला व्हिडीओ ग्रेटा थनबर्गनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

5 Sep 2024, 08:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वक्फ विधेयकाप्रकरणी गठित करण्यात आलेल्या संयुक्त सांसदीय समितीची आज बैठक 

आज वक्फ विधेयकाप्रकरणी गठित करण्यात आलेल्या संयुक्त सांसदीय समितीची बैठक आहे. संयुक्त सांसदीय समितीची ही तिसरी बैठक आहे. महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत, शिंदे गटाचे नरेश म्हस्के, शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे आणि भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी बैठकीत सहभागी होतील. संयुक्त सांसदीय समिती वक्फ विधेयकावर विचारविनिमय करुन आपला अहवाल संसदेला सादर करेल

 

5 Sep 2024, 08:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवची आज ईडी चौकशी

सोमवारी एल्विश यादवला लखनऊ येथील ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी जबाब नोंदवण्यासाठी येण्यास असमर्थता दर्शवून तीन दिवसांची मुदत मागितली होती.यासंदर्भात ईडीने एल्विश यादवला 5 सप्टेंबरची वेळ दिली होती.

5 Sep 2024, 08:26 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुणेकरांनो लक्ष द्या; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

पुण्यातील गणेशोत्सवात मध्य भागातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार आज पासून अवजड वाहनांना पुणे शहरात बंदी असणार आहे. शहरातील मध्य भागात ५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: व्यापारी पेठेत माल घेऊन येणारी जड वाहने शहराबाहेर उतरावीत. त्यानंतर छोट्या वाहनातून साहित्य मध्य भागात आणावे. जड वाहनचालकांनी मध्य भागात वाहने आणू नयेत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे