Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील निवडणुकांची सूत्र थेट अमित शहांच्या हाती

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश -विदेशातील घडामोडी जाणून घेऊया आता एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील निवडणुकांची सूत्र थेट अमित शहांच्या हाती

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि इतर मुद्दे चर्चेत आले आहेत. देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया एका क्लिकवर 

21 Sep 2024, 10:41 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: जळगाव शहरातील एका अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या

ळगाव शहरात हरिविठ्ठल नगरात बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडी क्रमांक ६१मध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत अळी आढळली. प्रकल्प अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिवाय, पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत हरिविठ्ठल नगरात अंगणवाडी (क्र.६१) चालवली जाते.

21 Sep 2024, 10:41 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील निवडणुकांची सूत्र थेट अमित शहांच्या हाती

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच राज्य भाजपची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्याचाच भाग म्हणून शहा  येत्या बुधवारी 25 तारखेला
नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. एकीकडे महायुतीच्या नेत्यांसोबत जागावाटपासाठी वाटाघाटी सुरू असतानाच शहा यांनी राज्याचे विभागनिहाय दौरे सुरू केले आहेत. शहा यांच्या नाशिकमधील चार तासांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतील संघटनेच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. 

21 Sep 2024, 10:38 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी तक्रार दराकडून 5000 रुपयाची लाच घेताना गोंदिया एसीबीच्या टीमने अटक केली आहे. आरोपीचे नाव वनरक्षक तुलसीदास चव्हाण व वनमजूर देवानंद कोजबे असे आहे सांगण्यात आले आहे

21 Sep 2024, 10:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: ओबीसी नेत्यांनी इथे येऊन ताकद दाखवू नयेः जरांगे पाटील

21 Sep 2024, 09:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: धनगर आणि मराठे कधीच तुटू शकत नाहीः मनोज जरांगे

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद सुरू आहे. 

21 Sep 2024, 08:59 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  राष्ट्रपतींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा केला मंजूर

राष्ट्रपतींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा मंजूर केला आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांचा आाज शपथविधी संध्याकाळी ४:३० वाजता होणार आहे.आतिशी यांच्यासह ५ कॅबिनेट मंत्री देखील शपथ घेणार आहेत.

21 Sep 2024, 08:41 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: सोलापूरच्या कीर्ती भाराडियाचा आणखी एक विश्वविक्रम

सोलापूरच्या कीर्ती भाराडियाचा आणखी एक विश्वविक्रम. तब्बल 32 किलोमीटरचे अंतर सलग 10 तास 25 मिनिटे समुद्रात पोहत केला विश्वविक्रम.श्रीलंकेतील तलाईमनार ते भारतापर्यंत पोहत समुद्री प्रवास करत विशाल लाटा आणि माशांच्या दुर्गंधीचा सामना करत मिळवले यश

21 Sep 2024, 08:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  मराठा समन्वयकांना बीड पोलिसांची नोटीस

बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क असून जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त समन्वयकांना पोलिसांची नोटीस मराठा समन्वयकांना बीड पोलिसांची नोटीस देण्यात आली आहे. प्रशासनाने पाठवलेल्या नोटिसाना आम्ही भिक घालत नाहीत,पोलिसांकडून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केला आहे. तसंच, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीदेखील करण्यात येत आहे. 

21 Sep 2024, 07:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज जळगाव जिल्ह्यात

शिवस्वराज्य यात्रेच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विधानसभेचे रणशिंग फुकणार आहेत. २१ व २२ नोव्हेंबर रोजी ही यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. यानिमित्त पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील जिल्हा दौऱ्यावर 

21 Sep 2024, 07:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  मनोज जरांगे पाटलांच्या  समर्थनार्थ आज धाराशिव जिल्हा बंदची हाक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असुन जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे तरीही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने आज धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.शासनाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार असुन सर्वांनी शांततेत बंद पाळावा अस आवाहन शनिवारी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल होते.त्यामुळे सकाळपासून शहरात शुकशुकाट पाहायला मिळत असुन बहुतांश भागात दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.दुपार नंतर मराठा बांधव आंतरवली सराटीकडे जाणार आहेत अस देखील मराठा बांधवांनी सांगितले.