Breaking News LIVE Updates: 'राज ठाकरे महायुतीसोबत राहतील', भरत गोगावले यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले...

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील आजच्या प्रमुख घडामोडींबरोबरच पावसाचे सर्व अपडेट्स आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांचा धावता आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून... 

Breaking News LIVE Updates: 'राज ठाकरे महायुतीसोबत राहतील', भरत गोगावले यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले...

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रात आज पावसाबरोबरच राजकीय घडामोडींकडेही विशेष लक्ष असणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतोय. प्रामुख्याने पुणे, मुंबई, कोल्हापूरसहीत घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस झाला असून आजही महाराष्ट्रातील अनेक भागांना आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभेसाठीचं रणशिंग फुकलं असून याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींकडेही आज राज्यातील जनतेचं विशेष लक्ष असेल. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींची अपडेट्स आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा....

26 Jul 2024, 19:56 वाजता

'राज ठाकरे महायुतीसोबत राहतील', भरत गोगावले यांनी स्पष्ट सांगितलं

राज ठाकरे यांनी जे काही ठरवलं तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. पण मला असं वाटतं की ते महायुतीसोबत राहतील आणि जेव्हा जागावाटप होतील तेव्हा त्यातल्या काही जागा त्यांना थोड्या थोड्या दिल्या जातील असं मला वाटतं, असं भरत गोगावले म्हणाले आहेत. 

26 Jul 2024, 18:48 वाजता

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट

पुणे कल्याणनगर पोर्श कार अपघात प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांकडून तपास करून चार्जशीट केले आहे. तर शिशिर हिरे यांची या प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

26 Jul 2024, 17:56 वाजता

शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांची हायकोर्टात याचिका

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती याचिका शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या उबाठा आमदारांविरोधात आम्ही अपत्रातेची याचिका दाखल केली होती. त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिका माननीय उच्च न्यायालयात केली असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे. 

26 Jul 2024, 15:07 वाजता

पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ॲक्शन मोडवर

- 2022 मधील राज्यसेव परीक्षेतील दिव्यांगांच्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांची होणार चौकशी
- तब्बल आठ जणांची होणार चौकशी
- दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन वर्ग दोनची नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांची 29 जुलैला होणार चौकशी
- दिव्यांग प्रमाणपत्र प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता
- पूजा खेडकर प्रकरणानंतर दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन लाभ घेणाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात

26 Jul 2024, 14:53 वाजता

मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांना बंदी

मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक बॅग, प्लास्टिकचे उत्पादने वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे रजिस्टर जनरल यांनी जारी केले पत्रक. मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांच्या निर्देशानुसार जारी केले परिपत्रक.

26 Jul 2024, 12:48 वाजता

अनिल देशमुखांसमोर 'भाजपचा विजय असो'ची घोषणाबाजी

नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देशमुख हे कार्यक्रम स्थळाकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांनी देशमुखांविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री मोवाडमध्ये अनिल देशमुख विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी गेले होते.  तेव्हा भूमिपूजनसाठीच्या नियोजित स्थळी काही भाजप कार्यकर्तेही आधीच उपस्थित होते. अनिल देशमुख यांची गाडी कार्यक्रम स्थळाच्या आवरात येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. या घटनेवेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते. अनिल देशमुख यांची गाडी पोलिसांनी सुरक्षितरित्या कार्यक्रमस्थळी नेली.

26 Jul 2024, 12:48 वाजता

अनिल देशमुखांसमोर 'भाजपचा विजय असो'ची घोषणाबाजी

नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देशमुख हे कार्यक्रम स्थळाकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांनी देशमुखांविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री मोवाडमध्ये अनिल देशमुख विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी गेले होते.  तेव्हा भूमिपूजनसाठीच्या नियोजित स्थळी काही भाजप कार्यकर्तेही आधीच उपस्थित होते. अनिल देशमुख यांची गाडी कार्यक्रम स्थळाच्या आवरात येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. या घटनेवेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते. अनिल देशमुख यांची गाडी पोलिसांनी सुरक्षितरित्या कार्यक्रमस्थळी नेली.

26 Jul 2024, 10:51 वाजता

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तीन धरणं ओव्हर फ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये आतापर्यंत 71.02 टक्केपाणीसाठा. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढला आहे. सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे. तर तुळसी, विहार आणि मोदक सागर धरण ओसंडून वाहत आहे. 

सात धरणात किती टक्के पाणीसाठा?

अप्पर वैतरणा - 39.41 टक्के 
मोडक सागर  - 100 टक्के 
तानसा          - 98.61 टक्के 
मध्या वैतरणा - 69.40 टक्के 
भातसा         - 69.20 टक्के
विहार          - 100 टक्के 
तुळसी        - 100

एकूण टक्केवारी - 71.02

26 Jul 2024, 10:19 वाजता

गुड न्यूज! सहा महिन्यानंतर उजनी 'प्लस'मध्ये

दीर्घ प्रतीक्षेनंतर उजनी धरणातील पाणीसाठा उणेमधून अधिकमध्ये आला आहे. 21 जानेवारी 2024 ला उजनी धरणामधील पाणीसाठा उणेमध्ये गेला होता. आज शुक्रवारी 26 जुलै रोजी सव्वा नऊच्या सुमारास उजनी धरणातील साधा अधिकमध्ये गेला आहे. उजनी धरणात सध्या एकूण 63. 73 टीएमसी पाणीसाठा आहे. उजनी धरण 0.13% प्लस मध्ये आहे.

26 Jul 2024, 09:21 वाजता

अलिबागच्या समुद्रात बचाव कार्य सुरु; 14 जणांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न

अलिबाग समुद्रात भरकटलेल्या बार्जवरील खलाशांचे बचाव कार्य सुरू आहे.  तटरक्षक दलाच्या हेलीकॉप्टरने खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं जाणार. बार्जवर एकूण 14 खलाशी अडकून पडले आहेत. जे एस डबल्यू कंपनीचे मालवाहू जहाज कालपासून भरकटले आहे. हे बार्ज अलिबागजवळ कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस समुद्रात अडकून पडले आहे. जयगड इथून साळाव इथे निघालेलं हे जहाज भरकटलं.