Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रात आज पावसाबरोबरच राजकीय घडामोडींकडेही विशेष लक्ष असणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतोय. प्रामुख्याने पुणे, मुंबई, कोल्हापूरसहीत घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस झाला असून आजही महाराष्ट्रातील अनेक भागांना आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभेसाठीचं रणशिंग फुकलं असून याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींकडेही आज राज्यातील जनतेचं विशेष लक्ष असेल. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींची अपडेट्स आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा....
26 Jul 2024, 06:41 वाजता
पुण्यात गुरुवारी 4 पाऊस बळी; आजही पावसाची शक्यता
पुण्यामध्ये गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणं जलमय झाली. पुण्यातील डेक्कन जिमखान्याजवळ तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला. तर दुसरीकडे ताम्हणी घाटामध्ये दरड कोसळल्याच्या घटनेत एकाने प्राण गमावले.
26 Jul 2024, 06:38 वाजता
महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकारच्या संपर्कात : फडणवीस
"महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी सातत्याने संवाद होतो आहे. 517.5 मीटर इतकी पाणीपातळी (एफआरएल) कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे आणि ते कर्नाटक सरकारने मान्य केले आहे," असं फडणवीस यांनी गुरुवारी रात्री दिलेल्या माहितीत म्हटलं.
राज्यात अनेक भागात मोठा पाऊस असल्याने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. याबाबतीत मी सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात असून, सिंचन अधिकार्यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
1) खडकवासलातून 35,300 क्युसेक इतका विसर्ग होत होता. तो आता…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 25, 2024
26 Jul 2024, 06:37 वाजता
कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढणार; फडणवीसांची माहिती
"कोयनेतून सध्या 20,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, तो पहाटे 3 वाजता 30,000 क्युसेक इतका होईल. सकाळी 9 वाजता तो 40,000 क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे. सिंचन विभागात सातत्याने जिल्हाधिकार्यांशी संपर्कात आहे," असं फडणवीस यांनी गुरुवारी रात्री दिलेल्या माहितीत म्हटलं.
26 Jul 2024, 06:36 वाजता
खडकवासलामधून किती पाणी सोडायचं यासंदर्भात घेणार निर्णय: फडणवीस
"खडकवासलातून 35,300 क्युसेक इतका विसर्ग होत होता. तो आता 40,000 क्युसेक इतका विसर्ग होत आहे. उद्या सकाळी पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. याची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेला सातत्याने देण्यात येत आहे," असं फडणवीस यांनी गुरुवारी रात्री दिलेल्या माहितीत म्हटलं.
26 Jul 2024, 06:34 वाजता
धरणांमधून पाण्याचा विसर्ग; फडणवीस सिंचन अधिकाऱ्यांच्या संपर्कात
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन राज्यातील प्रमुख धरणांमधून किती पाण्याचा विसर्ग होत आहे आणि तो किती होणार आहे यासंदर्भातील माहिती. "राज्यात अनेक भागात मोठा पाऊस असल्याने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. याबाबतीत मी सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात असून, सिंचन अधिकार्यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले आहे," असं फडणवीस म्हणाले.
26 Jul 2024, 06:22 वाजता
अफवांवर विश्वास ठेऊ नका; मुंबई महानगरपालिकेचं पालकांना आवाहन
"कृपया, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीशिवाय पालकांनी शाळा, महाविद्यालयांच्या सुटीसंदर्भातील अन्य कोणत्याही माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती आहे. अधिक माहितीसाठी शाळा व महाविद्यालये व्यवस्थापनाच्या संपर्कात रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे," असंही मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे.
26 Jul 2024, 06:21 वाजता
मुंबईत आज शाळा-महाविद्यालये सुरु: महानगरपालिकेची माहिती
पावसाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा-कॉलेजला आज सुट्टी असली तरी मुंबईतील शाळा सुरु आहेत. यासंदर्भातील माहिती मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन दिली आहे. "मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे. ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या शुक्रवार, दिनांक 26 जुलै 2024 रोजी नियमितपणे सुरू राहतील," असं महापालिकेने सांगितलं आहे.
मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे.
ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या शुक्रवार, दिनांक २६ जुलै २०२४ रोजी नियमितपणे सुरू राहतील.
कृपया, बृहन्मुंबई…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 25, 2024