बनायचं होतं फलंदाज, झाला गोलंदाज... आता दुलिप ट्रॉफीत उडवली दाणादाण... 7 मेडन, 7 विकेट

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियातले अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. पण या स्पर्धेत काह युवा खेळाडूही चमकताना दिसतायत. युवा फलंदाज मुशीर खानच्या धमाक्यानंतर आता मानव सुथार नावाच्या फिरकीपटूने आपला जलवा दाखवला आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 7, 2024, 04:18 PM IST
बनायचं होतं फलंदाज, झाला गोलंदाज... आता दुलिप ट्रॉफीत उडवली दाणादाण... 7 मेडन, 7 विकेट title=

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियातले अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. पण या स्पर्धेत काही युवा खेळाडूही चमकताना दिसतायत. युवा फलंदाज मुशीर खानच्या (Musheer Khan) धमाक्यानंतर आता मानव सुथार (Manav Suthar) नावाच्या फिरकीपटूने आपला जलवा दाखवला आहे.  डावा हाताचा फिरकीपटू मानवने इंडिया डीविरुद्ध खेळाताना तब्बल सात विकेट घेतल्यात. मानव सुथारच्या फिरकीसमोर इंडिया डी संघाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंडिया डी संघाने इंडिया सी संघाविरोधात खेळताना दुसऱ्या डावात 236 धावा केल्या. मानव सुथारने 19.1 षटकात अवघ्या 49 धावा देत 7 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे 19 षटकांपैकी सात षटकं त्याने निर्धाव टाकली.

बनायचं होतं फलंदाज, झाला गोलंदाज

मानव सुथारच्या क्रिकेटची सुरुवात राजस्थानच्या श्रीगंगानगरमधल्या एका लहानश्या क्रिकेट कोचिंग क्बलपासून झाली. मानवचे वडिल जगदीश सुथार यांनी त्याला क्रिकेट कोचिंग क्लबमध्ये प्रवेश घेऊन दिला. पण जगदीश सुथार यांनी क्बलच्या प्रशिक्षकाला आपल्या मुलाला आक्रमक फलंदाज बनवा असं सांगितलं. सेहवाग सारखी आपल्या मुलानेही तडाकेबंद फलंदाजी करावी असं मानवच्या वडिलांचं स्वप्न होतं. पण मानव जसजसं कोचिंग क्लबमध्ये क्रिकेटचा सराव करुन लागला. तसं प्रशिक्षक धीरज शर्मा यांनी मानवमधले क्रिकेटचे गुण ओळखले.

मानव एक उत्तम फिरकी गोलंदाज होऊ शकतो हे धीरज शर्मा यांनी हेरलं. त्यांनी त्या दृष्टीने मानवला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. धीरज शर्मा यांचा अंदाज अगदी अचूक ठरला. 22 वर्षांचा मानव सुथार हे आज स्थानिक क्रिकेटमधलं मोठं नाव बनलं आहे. मानवने आतापर्यंत 14 प्रथम श्रेणी सामन्यात 65 विकेट घेतल्या आहेत.

दुलीप ट्रॉफीत मानवचा जलवा

मानव सुथारने दुलीप ट्ऱॉफीत इंडिया डीविरुद्ध खेळताना एकाच सामन्यात 8 विकेट घेण्याची कमाल केली आहे. पहिल्या डावात मानवने एक विकेट घेतली तर दुसऱ्या डावात मानवने तब्बल सात विकेट घेत इंडिया डी संघाची धुळदाण उडवली. या सामन्यात मानवने इंडिया सीचा फलंदाज श्रीकर भरतला दोनवेळा आऊट केलं. याशिवाय  देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, अक्षर पटेल या सारख्या मोठ्या फलंदाजांनाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. मानव सुथारची दुलिप ट्रॉफीमधली कामगिरी पाहाता टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटसाठी त्याचे दरवाजे लवकर उघडतील असा अंदाज क्रिकेट तज्ज्ञ वर्तवतायत. मानव आयपीएलमध्येही खेळला आहे. गुजराज टायटन्स संघाकडून त्या एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. पण त्यानंतर तो एकही सामना खेळला नाही.