Maharashtra Breaking News LIVE :मुख्यमंत्री शिंदे उद्या करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

Maharashtra Breaking News LIVE : राज्यात आज पावसाची संततधार सुरूच आहे. राज्यातील पावसाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. 

Maharashtra Breaking News LIVE :मुख्यमंत्री शिंदे उद्या करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

Maharashtra Breaking News LIVE : राज्यात बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्याचच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा सक्रीय झाला आहे. आज अनेक जिल्ह्यात पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

25 Aug 2024, 19:55 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

- उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी. 

- पनवेलच्या पळस्पे नाका येथून कळणार पाहणी दौऱ्याची सुरुवात. 

- मुंबई गोवा महामार्गाच्या सध्याच्या परिस्थितीचा घेणार आढावा.

- मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात मुंबई गोवा हायवेचा मी स्वतः पाहणी दौरा करेल असा आश्वासन दिलं होतं. 

- त्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री उद्या हा दौरा कळणार आहे 

- यावेळी मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरण काम आणि हायवेची सध्याची स्थिती याचा आढावा घेणार

25 Aug 2024, 19:49 वाजता

बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची उद्या पोलीस कोठडी संपणार. 

बदलापूर मध्ये दोन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण जलदगती न्यायालयाने 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी मुदत संपणार असल्याने उद्या सकाळी कल्याणच्या जलदगती न्यायालयात हजर करणार आहे. आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालय पोलीस कोठडी मध्ये वाढ होते की न्यायालयन कोठडी मिळते याकडे सर्वांची लक्ष् लागले आहे.मात्र हे प्रकरणाची चौकशी एसआरटीकडे दिली असल्याने पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

25 Aug 2024, 19:21 वाजता

शेगांव येथील मंगल कार्यालयात राज ठाकरेंनी कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्ता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जात होता म्हणून सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. काही काळ गोंधळाचं वातावरण निर्मण झालं.

25 Aug 2024, 17:47 वाजता

हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

पालघर, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज.‌ तर काही ठिकाणी कोसळणार अत्याधिक मुसळधार पाऊस. हवामान खात्याकडून कोकणातील तिन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी 

 

25 Aug 2024, 16:54 वाजता

पुण्यात राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचा वारकरी संमेलनाच

पुण्यात राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचा वारकरी संमेलनाच समारोप सोहळा होतोय. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 7-8 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीची स्थापना, स्थापनेनंतर पहिलेच अधिवेशन.आहे
शरद पवार यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

25 Aug 2024, 15:52 वाजता

राज ठाकरे जय मालोकर या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांच्या भेटीला 

राज ठाकरे हे शेगाव जाण्याआधी जय मालोकार या कार्यकर्त्याच्या घरी जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडी तोडफोड प्रकरणातील मृत्यू पावलेल्या जय मालोकार यांच्या कुटुंबियांना सांत्वन भेट देण्यासाठी गेले आहे..

25 Aug 2024, 14:25 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: देशातील सगळ्या राज्याच्या पक्षांना सांगतोय, महिलांच्या विरोधात कृत्य केले तो वाचला नाही पाहिजे, मदत करणारा पण राहिला नाही पाहिजे, शाळा, पोलीस जिथं कुठं दिरंगाई झाली तिथं कारवाई झाली पाहिजे. हे पाप अक्षम्य आहे, सरकार येईल जाईल, जीवन रक्षा नारी रक्षा महत्वाची आहे, हे आमचे दायित्व आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

25 Aug 2024, 14:25 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महिला विरोधात अत्याचार करणाऱ्याला फाशी आणि जन्मठेपेची शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाचे अमिश दाखवून केलेल्या अत्याचाऱ्याच्या बाबतही कठोर कायदा आहे, केंद्र सरकार या कारवाईत राज्य सरकारच्या सोबत आहे.

25 Aug 2024, 14:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: आमची लाडकी बहीण मोठ्या संख्येने उपस्थित आहे, 6 हजार पेक्षा अधिक कोटींचा निधी दिला आहे. महाराष्ट्रातील महिलांना सुद्धा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे, त्यांना खूप शुभेच्छाः पंतप्रधान मोदी

25 Aug 2024, 14:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील इतिहास महिलांच्याशिवाय पूर्ण नाही, शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी माता जिजाऊने केले. शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुढे आल्या. भारताच्या मातृ शक्तीने समाज घडविण्यासाठी मोठे योगदान दिले. महाराष्ट्रातील महिला चांगलं काम करत आहेत, तुम्हा महिलांमध्ये जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची छाप पाहत आहे: पंतप्रधान मोदी