Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकाराच पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
9 Mar 2023, 14:26 वाजता
Maharashtra Budget 2023 - मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटींचा मत्स्यविकास कोष
- विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा
- प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य
- प्रकल्पामुळे विस्थापित वा तात्पुरत्या प्रभावित मासेमार कुटुंबांना मदत देण्यासाठी प्रकल्पाच्या 2 टक्के वा 50 कोटी रुपयांचा मत्स्यविकास कोष
- मासेमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या 120 अश्वशक्तीची अट काढली
- त्यामुळे 85 हजार अधिकच्या मासेमारांना लाभ
- वर्षानुवर्षाचा अनुशेष यावर्षी पूर्णत: दूर करणार
- यासाठी 269 कोटी रुपयांची तरतूद
- पारंपारिक मासेमारी करणार्या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखांचा विमा
9 Mar 2023, 14:26 वाजता
Maharashtra Budget 2023 - शेतकर्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या
- वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
- दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्यांना लाभ
- प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
- प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत
9 Mar 2023, 14:25 वाजता
Maharashtra Budget 2023 - गोसेवा, गोसंवर्धन...अहमदनगरला नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय
- देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार
- आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविणार
- देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ
- विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये
- अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय
9 Mar 2023, 14:25 वाजता
Maharashtra Budget 2023 - महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार...धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
- विकास महामंडळाची स्थापना करणार
- 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
- धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये
- 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी
- महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
- 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
- अहमदनगर येथे मुख्यालय असणार
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी
9 Mar 2023, 14:24 वाजता
Maharashtra Budget 2023 - शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!
- विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
- अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
- प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार
9 Mar 2023, 14:23 वाजता
Maharashtra Budget 2023 - शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांना निवारा-भोजन
- कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना सुविधा
- शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
- जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
9 Mar 2023, 14:22 वाजता
Maharashtra Budget 2023 - नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
- या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
- नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद
9 Mar 2023, 14:21 वाजता
Maharashtra Budget 2023 - नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी
9 Mar 2023, 14:21 वाजता
Maharashtra Budget 2023 - श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करणार
- आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’
- 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
- सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार
9 Mar 2023, 14:19 वाजता
Maharashtra Budget 2023 - गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्यांचा पूर्ण त्रास वाचणार
- अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ