Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकाराच पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
9 Mar 2023, 11:38 वाजता
Maharashtra Budget 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रामक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधाकांवर हल्लाबोल केला. तुमच्या सारखं शेतकरी तोंडाला पाने पुसले नाहीत. आम्ही 12 हजार कोटी रुपये दिले. तुम्ही 50 हजार मदत दिली. शेतकऱ्यांना तुम्ही नाही तर आम्ही मदत दिली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
9 Mar 2023, 11:28 वाजता
Maharashtra Budget 2023 : नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झालेली नाही, हरभऱ्याची खरेदी सुरु झालेली नाही. असं म्हणत राष्ट्रवादीच्या अजित पवार य़ांनी सत्ताधाऱ्यांना पेचात पकडलं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं 1 लाख एकर जमिनीचं नुकसान झाले. राज्याच्या प्रमुखांना मला ही माहिती द्यायची असल्याचं अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं. अजित पवार म्हणाले, सर्व विभाग आकडे आलेत. कांदा खरेदी माहिती देतात पण वास्तव वेगळं आहे. बळीराजा त्रासलेला आहे. कांदा, हरभरा खरेदी अद्याप सुरू केली नाही. तातडीनं मदत केली पाहिजे, असंही ते म्हणाले.
9 Mar 2023, 11:23 वाजता
Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत नक्की पोहोचेल असा विश्वासाचा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकारण नको असं आवाहन त्यांनी विरोधकांना दिलं. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, असं म्हणत त्यांनी याच वक्तव्यावर जोर दिला.
9 Mar 2023, 11:18 वाजता
Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळाचं वातावरण असतानाच अब्दुल सत्तार यांच्या वक्यत्वानं वेधलं लक्ष. 'गारपीट झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 39 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे पंचनामेही झाले आहेत. ज्यानंतर आता शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत पोहोचविली जाणार आहे. गेल्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांना मदत करण्यात आलेली आहे', अशी माहिती त्यांनी दिली.
9 Mar 2023, 11:17 वाजता
Maharashtra Budget 2023 : विधानसभेच्या आजच्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळी नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रविंद्र धंगेकर याचा शपथविधी पार पडला. ज्यानंतर लगेचच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून घेरण्यास सुरुवात केली.
9 Mar 2023, 10:48 वाजता
Maharashtra Budget 2023 : सत्ताधाऱ्यांविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. 'विकासकामांना स्थगिती देणाऱ्यांचा धिक्कार असो, विकासकामांची स्थगिती उठवा नाहीतर खुर्च्या खाली करा', अशा घोषणा विरोधक देत आहेत.
9 Mar 2023, 10:13 वाजता
Maharashtra Budget 2023 : देशाच्या विकासदरापेक्षा राज्याचा विकासदर कमी झाला असून, राज्यावरील कर्जाचा बोजाही वाढत आहे असं म्हणत नागरिकांवर याचा ताण येत अल्याची बाब विधानसभेबाहेर छगन भुजबळ यांनी अधोरेखित केली. सध्याचं सरकार अफाट खर्च करत असल्याचं म्हणत गुजरातच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांशी राज्यातील परिस्थितीशी तुलना केली.
9 Mar 2023, 10:06 वाजता
Maharashtra Budget 2023 : 'यंदाच्या अर्थसंकलपाकडून अनेक अपेक्षा आहेत, त्यामुळं योग्य असा अर्थसंकल्प मांडला जाईल अशी अपेक्षा करू. हे धडाकेबाज सरकार आहे, फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर करू नका. अनेक अडचणी राज्य समोर आहे त्याकडे लक्ष द्यायला हवे. आज राज्यात जी परस्थिती हे कदाचित सत्ताधाऱ्यांनी अभ्यास केला असावा. हे सरकार 18 तास काम फक्त कागदावर काम करते आहे. त्यातही फक्त मुंबईवर फोकस न करता इतर शहरावर सुधार लक्ष द्या', अशा सूचक शब्दांत रोहित पवार यांनी अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा व्यक्त करत सत्ताधाऱ्यांचे कान टोचले.
9 Mar 2023, 09:52 वाजता
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे. 'राज्यात यांचं सरकार आल्या पासून राज्यात कर्ज वाढलं आहे. सोबतच बेरोजगारीही वाढली आहे', असं म्हणत यंदाच्या निवडणुका समोर ठेवुनच हे बजेट मांडलं जाईल अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
9 Mar 2023, 09:09 वाजता
Maharashtra Budget 2023 : आगामी निवडणुका लक्षात घेता महत्त्वाच्या किंबहुना शक्य असेल त्या सर्वच आमदारांच्या मतदारसंघातील पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या तरतूदी केल्या जाऊ शकतात.