Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : आरोप, प्रत्यारोप आणि गोंधळ; अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिषभाषण आणि शोकप्रस्तावानंतर दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आता लक्ष दुसऱ्या दिवसाकडे...    

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : आरोप, प्रत्यारोप आणि गोंधळ; अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : विधान परिषदेत विरोधकांचा कांदा प्रश्नावरून गोंधळ झाला आणि हा मुद्दाच दुसऱ्या दिवशी गाजला. विरोधकांचा कांदा व कापूस प्रश्नावरचा स्थगन प्रस्ताव उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फेटाळला, ज्यामुळं विरोधक आक्रमक भूमिकेत दिसले. विरोधकांच्या गोंधळामुळे परिषद 15 मिनिटांसाठी आणि नंतर 25 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. पुढे विधान परिषदेचे आजचे कामकाज संपल्याचे जाहीर करत परिषद दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. उद्या सकाळी कामकाज सुरू होईल तेव्हा नव्या दिवशी कोणता नवा मुद्दा गाजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 

28 Feb 2023, 13:57 वाजता

विधानसभेत पत्रकार शशिकांत वारिसे हत्याप्रकरणावर चर्चा, भविष्यात पत्रकारांवर हल्ला होऊ नये यासाठी कायदा करण्याची सुनिल प्रभू यांची माहिती. सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला झाला तर कडक कारवाई केली जाते, त्याचप्रमाणे हा कायदा करण्याची सुनिल प्रभू यांची माहिती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कायदा आला आहे, दरवर्षी 30 गुन्हे दाखल होत होते, आता हे प्रमाण 10 वर आलं आहे.

28 Feb 2023, 13:21 वाजता

कांद्याच्या भावाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी गदारोळ केल्याने विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

28 Feb 2023, 12:57 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज प्रकरणावरून नाना पटोले यांनी सरकारला घेरलं. शिवाय अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवरूनही त्यांनी सरकारला जाब विचारला. 

28 Feb 2023, 12:07 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : सभ्यतेचे राजकारण केले पाहिजे असं म्हणत वैयक्तीक कुणावर बोलता कामा नये असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला. फडणविसांचे फ्रंट मॅन कंबोज यांनी काही आरोप केल्याचं म्हणत त्यांनी आरोप सिद्ध करावेत असा इशाराही त्यांनी दिला. 

 

28 Feb 2023, 11:41 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सध्या नाफेडनं कांदा खरेदी सुरु केली आहे असं सांगताना कांदा निर्यातीस बंदी नसल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 

 

28 Feb 2023, 10:40 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates :  सध्याचं सरकार फक्त फक्त निवडणूक प्रचार मध्ये व्यस्त आहे. त्यामुळं सरकार फक्त कागदावर काम करत आहे. कांदा आणि कापसू भाव कमी झालं तरी केंद्र सरकार ला एक पत्र लिहले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 

 

28 Feb 2023, 10:25 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates :  अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडी नेत्यांची बैठक काँग्रेस,एनसीपी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सहभागी. आजचा दिवस कामकाज आणि रणनिती यावर चर्चा

 

28 Feb 2023, 10:10 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : कांद्याच्या दरावरून लासलगावमध्ये शेतकरी आक्रमक असल्याची बाब छगन भुजबळ यांनी विधीमंडळांत मांडली. केंद्र आणि राज्य हे मुद्दे सहज सोडवू शकतात असं म्हणत कांदा निर्यातीमुळं शेकऱ्यांना बळ मिळेल हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 

 

28 Feb 2023, 09:59 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates :  विधीमंडळ परिसरात कांद्याच्या दरांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. इथं त्यांच्याकडून आंदोलन सुरु करण्यात आलं असून, कांद्याची टोपली डोक्यावर घेत, कांद्याच्या माळा गळ्यात घालत विरोधक घोषणाबाजी करत आहेत. 

 

28 Feb 2023, 09:29 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : ठाकरे गटाला कुणाची मान्यता? ठाकरे गट नावाचा कोणताही गट नाही, राज्यात फक्त शिवसेना आहे. मी उद्धव ठाकरेंचं नैराश्य समजू शकतो, असं म्हणत आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वळल्या नजरा.