VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं आम्हालाही दु:ख - अंबादास दानवे

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं आम्हालाही दु:ख - अंबादास दानवे

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

12 Jul 2024, 16:34 वाजता

मला माझ्या मताची किंमत कळली आहे  - हितेंद्र ठाकूर 

- मी काही ठिकाणी अडकलो होतो त्यामुळे आता उशीर आलो. पण मी मतदान केलं आहे.  

- बहुजन विकास आघाडीचे भवितव्य म्हणजे मला माझ्या मताची किंमत कळली आहे 

 - तशी आता मतं मी माझ्या पक्षात वाढवणार 

 - सर्व पक्ष आमच्यावर लक्ष ठेवतात 

 - विधान परिषदेच्या निवडणुकीत माझा जिल्हा माझी ताकद माझा तालुका हे माझ्यासोबत आहे 

 - धक्का कोणाला बसेल हे मला माहित नाही मी तेवढा मोठा नाही 

 - निवडणुकीत एकमेकांवर चिखल फेकला, फक्त त्याचा दर्जा ठेवावा एवढीच माझी मागणी

12 Jul 2024, 15:42 वाजता

VidhanParishad Election Live Updates: सर्व आमदारांचं मतदान पूर्ण, मनसेचे राजू पाटील आणि तर बविआचे हितेंद्र ठाकूरांचे 3 आमदार शिल्लक होते

12 Jul 2024, 15:03 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : 4 आमदारांचं मतदान बाकी

मनसेचे राजू पाटील, तर बविआचे हितेंद्र ठाकूरांचे 3 आमदार असे 4 आमदारांचे मतदान बाकी आहे

 

12 Jul 2024, 14:01 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : मोठी बातमी! अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट 

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटलांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेता हसत एकमेकांशी संवाद साधताना दिसून आलेत. तरदुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि अजित पवार यांचीही भेट लक्षवेधी ठरली. 

12 Jul 2024, 13:11 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : झिशान सिद्दीकी आणि आमदार कैलास गोरंट्याल यांची गळाभेट 

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी आणि आमदार कैलास गोरंट्याल यांनी गळाभेट घेतलीय. झिशान सिद्दीकी यांनी मतदान केल्यानंतर गोरंट्याल यांना मिठी मारली. कालच गोरंट्याल यांनी झिशान सिद्दीकींचं नाव न घेता आरोप केला होता. काही आमदारांची मतं फुटू शकतात असा दावा गोरंट्याल यांनी केला होता. मात्र, झिशान सिद्दीकींनी या आरोपांनंतरही विधान भवनात येऊन मतदान केलंय. पक्षश्रेष्ठी सांगतील त्याला मतदान करणार असं म्हटलं.

12 Jul 2024, 13:06 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : मतदानावेळी ठाकरे गटाकडून खबरदारी 

विधान परिषदेच्या मतदानावेळी ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात आलीय. ठाकरे गटाच्या 5-5 आमदारांचा गट करून मतदान केलं जातंय. पहिल्या टप्प्यात भास्कर जाधव, प्रकाश फातर्पेकर, राजन साळवी, ऋतुजा लटके, विनोद निकोले हे मतदानासाठी गेलेत. त्यानंतर दुसरा गट मतदान करणार आहे. मतदानावेळी गोंधळ उडू नये यासाठी ठाकरे गटाकडून छोटे छोटे गट करून मतदान केलं जातंय.

12 Jul 2024, 12:42 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : आतापर्यंत 222आमदारांनी मतदान केले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. भाजप आणि समर्थक असे 100 आमदारांनी मतदान केलंय. तर शिवसेना ठाकरे गटातील आमदारांचे मतदान बाकी आहे. त्यामुळे आतापर्यंत 222 आमदारांनी मतदान केलंय. 

आत्तापर्यंत झालेलं मतदान
भाजप-100
अपक्ष-9
अजित पवार गट-39 + अपक्ष2= 41
शिंदे गट-30
काँग्रेस-30
शरद पवार गट-12

 

12 Jul 2024, 11:46 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : आम्ही दोन वर्षांपासून शिंदेंसोबतच आहोत - कडू 

आम्ही दोन वर्षांपासून शिंदेंसोबतच आहोत. त्यामुळे आमची 2 मतं शिंदेंच्या उमेदवाराला जातील अशी प्रतिक्रिया कडूंनी दिलीय. शिंदेंच्या एकाही आमदारांचं मत फुटणार नाही असा विश्वास कडूंनी व्यक्त केलाय.

 

12 Jul 2024, 11:12 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : विधान भवनाच्या गेटवरच नार्वेकर ठाण मांडून

मिलिंद नार्वेकरांकडून आमदारांच्या गाठीभेटी आजही सुरू आहेत. विधान भवनाच्या गेटवरच नार्वेकर ठाण मांडून आहेत. आज त्यांनी बावनकुळे, चंद्रकांत पाटलांची भेट घेतली. मतांसाठी मिलिंद नार्वेकरांची आजही मोर्चेबांधणी सुरू आहे.

12 Jul 2024, 10:47 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : सत्तेचा गैरवापर, गायकवाडांच्या मतदानावर बोट ठेवत राऊतांची टीका

गणपत गायवाड यांच्या मतदानावरून संजय राऊतांनी टीका केलीय. गणपत गायकवाड मतदानासाठी जेलमधून येऊ शकतात. मात्र, अनिल देशमुखांना मतदानासाठी येऊ दिलं नाही...यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात असं म्हणत राऊतांनी गायकवाडांच्या मतदानावर बोट ठेवलंय...