VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं आम्हालाही दु:ख - अंबादास दानवे

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं आम्हालाही दु:ख - अंबादास दानवे

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

12 Jul 2024, 08:50 वाजता

Mumbai Rain Live Updates : सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जॅम

मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोर धरलाय...वडाळाच्या आरटीओ ऑफिस परिसरात पावसाचं पाणी साचलंय...तर किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचल्याने स्थानिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागतेय...दुसरीकडे ट्रॅफिकही जॅम झाल्याने मुंबईकरांना ऑफिसला पोहोचायला उशीर होतोय...

 

12 Jul 2024, 08:47 वाजता

VidhanParishad Election Live Updates : मतांची व्यवस्थित जुळवाजुळव केलंय - अनिल देसाई

मविआचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंनी व्यक्त केलाय...तिन्ही उमेदवारांसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्तृत्वाने मतांची व्यवस्थित जुळवाजुळव केलीय...त्यामुळे मविआचे तिघेही उमेदवार निवडून येतील...तसंच मुंबईत पाऊस असल्याने मतदानासाठी 1 तास वाढवून द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलीय...

 

12 Jul 2024, 08:43 वाजता

VidhanParishad Election Live Updates : महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकतील - खोसकर

महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केलाय. खोसकरांकडून दगाफटका होऊ शकतो असा नाव न घेता कैलास गोरंट्याल यांनी आरोप केला होता. 

 

12 Jul 2024, 08:39 वाजता

Mumbai Rain Live Updates : मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस

मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. दादर, सायन, कुर्ला परिसरात पावसाची संततधार सुरु असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवलीतही पावसाची बॅटिंग सुरु असल्याने तिन्ही रेल्वे मार्गांना पावसाचा फटका बसलाय. 

 

12 Jul 2024, 08:38 वाजता

VidhanParishad Election Live Updates : भाजपचे उमेदवार अमित गोरखे सिद्धिविनायक मंदिरात 

भाजपा विधान परिषद उमेदवार अमित गोरखे यांनी सिद्धीविनायक मंदिर इथं दर्शन घेऊन आजच्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले. 

 

12 Jul 2024, 08:35 वाजता

VidhanParishad Election Live Updates : मतदानासाठी 1 तासाचा वेळ वाढवून द्यावा - नार्वेकर

मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढलाय.. त्यामुळे मतदानासाठी 1 तासाचा वेळ वाढवून द्यावा अशी मागणी मिलिंद नार्वेकरांनी केलीये.

12 Jul 2024, 08:34 वाजता

VidhanParishad Election Live Updates : ठाकरे गटाचे 15 आमदार आणि एक अपक्ष आमदार एकत्र जाणार 

परेलच्या आयटीसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे 15 आमदार आणि एक अपक्ष आमदार आहे...मतं फुटू नये यासाठी ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात आलीय... सगळे आमदार एकत्र मतदानासाठी जाणारेत. सकाळी साडेदहाच्या सुमारास आमदार एकत्रित बसनं विधानभवनासाठी रवाना होतील. 

 

12 Jul 2024, 08:32 वाजता

Maharashtra Breaking News Live Updates : काँग्रेसचे 3 ते 4 आमदार फुटू शकतात, आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट 

काँग्रेसचे 3-4 आमदार फुटू शकतात अशी शक्यता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केलीये. तर जे डाऊटफूल आहेत त्यांचा बंदोबस्त केला जाईल असंही ते म्हणालेत. आंध्र आणि नांदेड बॉर्डरसह टोपीवाला आमदार फुटण्याची शक्यता गोरंट्याल यांनी व्यक्त केलीये. हॉटेल पॉलिटिक्स मध्ये आमच्या काँग्रेसच्या आमदारांचे फक्त जेवण आहे. आमचे चेन्नीथला येणार आहेत. ते मार्गदर्शन करणार आहेत. जे 3-4 डाऊटफूल आहेत त्यांची व्यवस्था केली जाईल असंही ते म्हणाले.

12 Jul 2024, 08:27 वाजता

VidhanParishad Election Live Updates : 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणाराय...11 जागांसाठी 12 उमेदवार रिँगणात आहेत... प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सर्वंच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय...त्यामुळे एका जागेवर कुणाचा गेम होणार,  आणि कोण बाजी मागणार याकडे लक्ष लागलंय...निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्ष सतर्क झालेयत...रात्रभर दिग्गज नेते आमदार ठेवलेल्या हॉटेलमध्ये ठाण मांडून बसलेत...विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा आहे...त्यामुळे मविआ किंवा महायुतीच्या एका उमेदवाराचा गेम होणाराय...हा उमेदवार कोण आहे ते आजच स्पष्ट होणाराय...