VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं आम्हालाही दु:ख - अंबादास दानवे

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं आम्हालाही दु:ख - अंबादास दानवे

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

12 Jul 2024, 10:45 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : शिंदे गटाच्या आमदारांना वाहतूक कोंडीचा फटका

एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. शिंदे गटाच्या आमदारांची बस वाहतूक कोंडीत अडकलीय. वरळी सी लिंकजवळ शिंदे गटाच्या आमदारांची बस अडकली असून पावसामुळे मुंबईत वाहतूक कोंडी झालीय. 

 

12 Jul 2024, 10:43 वाजता

VidhanParishad Election Live Updates  : पोलीस बंदोबस्तात गणपत गायकवाड तळोजा जेलमधून विधानभवनात

कडक पोलीस बंदोबस्तात आमदार गणपत गायकवाड यांना विधानपरिषद मतदानासाठी तळोजा जेलमधून विधानभवनात आणण्यात आलं. मात्र  गणपत गायकवाड यांच्या मतदानाला काँग्रेसने विरोध केलाय. राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहेत. 

 

12 Jul 2024, 09:43 वाजता

Maharashtra Breaking News Today Updates : जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज जालन्यात 

जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज जालन्यात होणाराय...या रॅलीच्या पार्श्वभूमीवर 6 आयोजकांना उपविभागीय पोलीस अधिका-यांकडून नोटीस पाठवण्यात आलीय...कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आयोजकांना जबाबदार धरणार असं या नोटीस उल्लेख करण्यात आलाय...

 

12 Jul 2024, 09:42 वाजता

Maharashtra Breaking News Today Updates : शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती रॅली

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती रॅली उद्या संभाजीनगरमध्ये दाखल होणारेय. लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता शहरातील जालना रस्ता 7 तास बंद ठेवण्यात येणारेय. या मार्गावरील 200 पेक्षा अधिक दुकानांसह हॉटेल, बार बंद ठेवली जाणार आहेत. तर शहरातील 600 शाळा आणि 50 पेक्षा जास्त कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

12 Jul 2024, 09:41 वाजता

Mumbai Rain Live Updates  : चांदिवली नाका परिरसातही पावसामुळे रस्ते जलमय झालेत. त्यामुळे वाहनधारकांवर पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आलीये. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकही मंदावलीये.

12 Jul 2024, 09:40 वाजता

Mumbai Rain Live Updates  : वडाळाच्या आरटीओ ऑफिस परिसरात पावसाचं पाणी साचलंय...ट्रॅफिकही जॅम झाल्याने मुंबईकरांना ऑफिसला पोहोचायला उशीर होतोय...

12 Jul 2024, 09:39 वाजता

Mumbai Rain Live Updates  :  कल्याण आणि डोंबिवलीतही पहाटेपासून पावसाचा जोर वाढलाय.. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय... 

12 Jul 2024, 09:39 वाजता

Mumbai Rain Live Updates  : मुंबईच्या पश्चिम उपनगरातही पावसाने हजेरी लावलीये...वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवलीतही पाहाटेपासूनच पावसाची बॅटिंग सुरूये...

12 Jul 2024, 09:38 वाजता

Mumbai Rain Live Updates  : पावसामुळे याठिकाणचे रस्ते जलमय

मुंबईत संततधार पाऊस सुरूये. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं दिसून येतंय. चांदिवली नाका या भागातही अशीच काहीशी परिस्थिती उद्धभवलीये. पावसामुळे याठिकाणचे रस्ते जलमय झालेत. त्यामुळे वाहनधारकांवर पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आलीये. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकही मंदावलीये.

 

12 Jul 2024, 09:03 वाजता

Mumbai Rain Live Updates : महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील - पंकजा मुंडे

महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय. बाकी चर्चांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही, 9 उमेदवार हे निश्चित निवडून येतील असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलंय. पंकजा मुंडेंसह महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विधान भवनात दाखल झाल्यायत.