टीम इंडियाच्या 0-3 Whitewash नंतर आनंद महिंद्रांवर टीकेची झोड! जाणून घ्या कनेक्शन काय?

Anand Mahindra Trolled After India Whitewash Against New Zealand: मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे की परदेशी संघाने भारताला भारताच्या मैदानावर पराभूत केलं आहे. मात्र यानंतर आनंद महिंद्रा का ट्रोल होत आहेत जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 4, 2024, 10:44 AM IST
टीम इंडियाच्या 0-3 Whitewash नंतर आनंद महिंद्रांवर टीकेची झोड! जाणून घ्या कनेक्शन काय? title=
आनंद महिंद्रांवर होतेय टीका

Anand Mahindra Trolled After India Whitewash Against New Zealand: भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये पाहुण्या संघाने भारतीय संघाला घरच्या मैदानावर 0-3 ने पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली. वानखेडे स्टेडियमवरील अंतिम सामना न्यूझीलंडने अवघ्या 25 धावांनी जिंकल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या आधीच भारतावर अनेक दशकांनंतर व्हाइटवॉशचं तोंड पाहण्याची वेळ ओढावली. असं असतानाच भारताच्या या पराभवासाठी भारताच्या सुमार फलंदाजीला दोषी ठरवलं जात आहेत. विशेष म्हणजेच भारताच्या पराभवानंतर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रांनाही ट्रोल केलं जात आहे. मात्र भारताच्या पराभवाचा आणि आनंद महिंद्रांचा काय संबंध आहे? जाणून घेऊयात याचसंदर्भात...

झालं असं की या वर्षाच्या सुरुवातीला आनंद महिंद्रा यांनी सरफराज यांचे वडील नौशाद खान यांना एक नवीन थार कार गिफ्ट केली होती. महिंद्रा यांनी नौशाद यांच्यासाठी एक भावूक संदेश लिहिला होता. त्यांनी आपल्या मुलाला उत्तम शिकवण दिली असून त्यासाठी त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आपण त्यांना थार कार भेट म्हणून देऊ इच्छितो. ती कार त्यांनी स्वाकारली तर मी तो माझा सन्मान समजेल, असं आनंद महिंद्रा आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन म्हणाले होते. सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली. 16 फेब्रवारी 2024 रोजी आनंद महिंद्रांनी आपल्या पोस्टमध्ये, "हिंमत सोडू नकोस! केवळ कठोर मेहनत, साहस आणि धैर्य... एका वडिलांना आपल्या मुलाला प्रेरणा देण्यासाठी याहून उत्तम गुण काय असू शकतील? माझा हा सन्मान आणि सौभाग्य असेल तर नौशाद खान यांनी मी देऊ करत असलेली थार कार भेट म्हणून स्वीकारली," असं म्हटलं होतं.

त्यानंतर 23 मार्च रोजी सरफराजच्या वडिलांनी आनंद महिंद्रांनी दिलेली ही थार कार स्वीकारली होती. त्यावेळेस सरफराजही उपस्थित होता

या दोन्ही पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करत एका चाहत्याने आपला संताप व्यक्त करत सरफराजवर टीका केली आहे. "आता आनंद महिंद्रांवर हसलं पाहिजे. त्यांनी त्यांची थार फुकट घालवली. सरफराज खानच्या पीआरला ते बळी पडले. या फिरक्या गोलंदाजांच्या सो कॉल्ड राजाने 3 शून्य आणि 3 डावांमध्ये 15 पेक्षा कमी धावा केल्यात. एकूण 8 डावांमधील त्याच्या या खेळी आहेत," असं भारताचा 0-3 ने पराभव झाल्यानंतर म्हटलं आहे.

आनंद महिंद्रांनी सरफराजला थार गिफ्ट केल्यापासून त्याची कामगिरी कशी आहे हे अन्य एकाने सांगितलं आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीमध्ये तिसऱ्या कसोटीत 62 आणि नाबागद 68 धावा केल्या तेव्हा त्याला थार मिळाली. त्यानंतर चौथ्या कसोटीत सरफराजने 14 आणि शून्य धावांची खेळी केली. याच मालिकेतील पाचव्या कसोटीत त्याने 56 धावा केल्या. तसेच नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सरफराजने पहिल्या सामन्यात 0 आणि 15 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत 11 आणि 9 धावा केल्या. तिसऱ्या कसोटीत 0 आणि 1 धाव करत सरफराज तंबूत परतला, अशी आठवण चाहत्याने करुन दिली आहे.

म्हणजेच आता सरफराजच्या सुमार कामगिरीमुळे आनंद महिंद्रा ट्रोल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.