Maratha Reservation LIVE: नांदेडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले जमाव बंदीचे आदेश

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे.  

Maratha Reservation LIVE:  नांदेडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले जमाव बंदीचे आदेश

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. संतप्त जमावाने राजकीय नेत्यांची घरे, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.

31 Oct 2023, 22:24 वाजता

नांदेड जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचे आदेश काढले आहे. नांदेड जिल्ह्यात उपोषण, आंदोलन, धरणे, मोर्चे, रॅली आयोजनावर पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू असणार आहे. नांदेड जिल्हात झालेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. कलम 144 चे उल्लंघन करण्याऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 

31 Oct 2023, 18:36 वाजता

संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जरांगेंची पत्रकार परिषद सुरू असताना नेट बंद झाले.  इंटरनेट बंद झाल्यानं जरांगे संतापले आहेत.  इंटरनेट बंद करा, टॉवर घरी घेऊन जा असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला आहे. 

31 Oct 2023, 16:32 वाजता

सोलापूर - मराठा समाजाच्या वतीने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध

- सोलापुरात मराठा समाज आक्रमक

- सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळत आरक्षणाची मागणी

- सरकारचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी

- सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे पुलावर जाळण्यात आले टायर

- मराठा समाजातील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक

- वाहनांच्या लांबच लांब रांगा

31 Oct 2023, 16:03 वाजता

सुनिल तटकरे 

- उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे 
- आज संध्याकाळी मराठा आरक्षण विषयी बैठक होणार आहे
- मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वांचीच भुमिका आहे 
- एकीकडे लाखोंचे मुक मोर्चे, आणि कालची जाळपोळ हे दुर्दैव आहे
- समाजात अस्वस्था निर्माण झाल्यावर त्याचा राजकीय फायदा घेणा-यांवर आणि बेलगाम बोलणा-यांवर मी काही बोलू इच्छित नाहीये 
- परिस्थितीचे गांभीर्य सर्वांनी ओळखले पाहिजे

31 Oct 2023, 15:32 वाजता

सांगली - मराठा आरक्षण मागणीसाठी जत जवळ कर्नाटक सीमेवर बसवर दगडफेक.

कर्नाटक राज्याच्या एसटी बसवर करण्यात आली दगडफेक.

दगडफेकीत काही प्रवासी किरकोळ जखमी.

जत - विजयपुर मार्गावर दुचाकीवर आलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करत केली दगडफेक.

कर्नाटकच्या सातारा - विजयपूर बसवर करण्यात आली दगडफेक

31 Oct 2023, 15:31 वाजता

मंत्रिमंडळातील निर्णय - 

मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत. 
- कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू.
- मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करणार.
- न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार.

31 Oct 2023, 15:09 वाजता

मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला इशारा

बीड येथे झालेल्या उग्र आंदोलनानंतर संचारबंदी. दरम्यान पोलिसांनी काही साखळी उपोषण उठविले आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला फोन लावून केली नाराजी व्यक्त. जर तातडीने उपोषण उठवणे बंद झाले नाही तर मी स्वतः लाखो लोकांना घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करेन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

31 Oct 2023, 14:46 वाजता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनोज जरांगे पाटील यांना पत्र...

ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं “विशेष अधिवेशन” भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा
- राज ठाकरे

31 Oct 2023, 14:22 वाजता

नवले पुलाजवळ टायर जाळून आंदोलन 

पुण्यामधील नवले पुलाजवळ आंदोलकांनी टायरची जाळपोळ केली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. मराठा आंदोलकांनी मुंबई-सातारा रस्त्यावरही टायर जाळलेत. कात्रज-देहूरोड रस्त्यावरही टायर जाळण्यात आले आहेत.

31 Oct 2023, 14:01 वाजता

मराठा आरक्षणासाठी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा

भाजपा आमदार राजेश पवार यांची राज्यपालांकडे मागणी

सत्ताधारी आमदारांमधूनही आता मराठा आरक्षणासाठी विशेष आधिवेशनाची मागणी