Maratha Reservation LIVE: नांदेडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले जमाव बंदीचे आदेश

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे.  

Maratha Reservation LIVE:  नांदेडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले जमाव बंदीचे आदेश

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. संतप्त जमावाने राजकीय नेत्यांची घरे, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.

31 Oct 2023, 08:17 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावलीय. आज संध्याकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणारेय. त्यात मराठा आरक्षणाबाबत बैठकीत चर्चा होणारेय. या बैठकीत आरक्षणाबाबत तोडगा निघेल असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांनी शांततेचं आवाहन केल्याचंही गुलाबराव पाटलानी सांगितलं. 

31 Oct 2023, 08:11 वाजता

मराठा आरक्षणाबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे.. या बैठकीत कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नेमलेल्या शिंदे समितीचा अहवाल ठेवला जाईल.. तसंच मनोज जरांगे यांनी केलेल्या विशेष अधिवेशनाच्या मागणीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मविआच्या नेत्यांनीही काल विशेष अधिवेशनाची मागणी केलीय. तेव्हा आजच्या बैठकीत विशेष अधिवेशनावर निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.. बीडसह अनेक भागांत जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहे.. राष्ट्रवादीच्या आमदाराचंच घर पेटवण्यात आल्याने त्याचे पडसादही बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.

31 Oct 2023, 07:54 वाजता

बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आलीये.. बीडमधील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलीये.. ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्यानं संचारबंदी लागू करण्याचा निर्णय बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घेतलाय..

31 Oct 2023, 07:48 वाजता

संतप्त आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंकीचं घर पेटवल्यानंतर छगन भुजबळांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलीय. त्यांच्या सिद्धगड निवासस्थानाला छावणीचं स्वरूप आलंय. तसंच त्यांच्या नाशिकच्या घराला तसंच येवल्यातील संपर्क कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीय. तर ओबीसीतून आरक्षण देऊ नये असं छगन भुजबळांनी म्हंटलं होतं.