Maratha Reservation LIVE: नांदेडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले जमाव बंदीचे आदेश

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे.  

Maratha Reservation LIVE:  नांदेडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले जमाव बंदीचे आदेश

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. संतप्त जमावाने राजकीय नेत्यांची घरे, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.

31 Oct 2023, 13:41 वाजता

नेत्यांना मुंबईतही बंदी
मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना मुंबईतही बंदी करण्यात आली आहे. 
मराठा आरक्षणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या मुंबईतील ससून डॅाक बंद राहणार आहे. तसंच उद्या सकाळी ९ वाजता ससून डॅाक येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनही केले जाणार आहे.

 

31 Oct 2023, 13:18 वाजता

आरक्षणाच्या मुद्द्यावर अजुनही मार्ग निघत नाही. काल मुख्यमंत्र्यांनी मिटींग घेतली पण याला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. एका मुख्यमंत्र्यांना डेंग्यु झाला तर दुसरे पक्षाच्या प्रचारासाठी रायपूरला गेले आहे. कृपा करुन तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन त्यांनी जरांगे पाटलांना केले आहे. 

31 Oct 2023, 13:01 वाजता

अतंरवाली सराटी येथे छत्रपती शाहू महाराज आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. मी अर्धवट आरक्षण घेणार नाही. दोन दिवसात आरक्षण न दिल्यास पाणी प्यायचे सोडणार असे मनोज जरांगे यांनी छत्रपती शाहू महाराज यांना सांगितले. सरकारला मागणी मान्य करावीच लागेल असे छत्रपती शाहू महाराज म्हणाले.

31 Oct 2023, 12:53 वाजता

मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची उपसमितीसोबतची होणारी आजची बैठक रद्द होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील याचं शिस्टमंडळ आले नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी बसलेल्या जरंगे पाटील यांच्या शिष्ठमंडळासोबत उपसमितीची बैठक मंत्रीमंडळाच्या बैठकिनंतर ठरली होती. मात्र सरकार सोबत होणारी बैठक रद्द होण्याची शक्यता आहे.

31 Oct 2023, 12:43 वाजता

अकोल्यात आरक्षणासाठीचं मराठा आंदोलन चिघळलं. एक तरुण आंदोलकानं अंगावर काळे ऑइल टाकून आंदोलन केलं. यावेळी त्यानं सरकारच्या निषेध करत घोषणाबाजी केली. अनुचित प्रकार घडण्याअगोदर पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आंदोलक तरुणाला ताब्यात घेतलं

31 Oct 2023, 12:21 वाजता

गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. तसेच बीड, छ. संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे. या जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पुर्णतः बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

वाचा सविस्तर: मराठा आरक्षणाचा राग लालपरीवर! मराठवाड्यात 85 बसेसची मोडतोड-जाळपोळ; 4 कोटींचे नुकसान

31 Oct 2023, 12:20 वाजता

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यत मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली...  निमखेड,  टाकळी जिवरग फाट्यावरती आमदार अब्दुल सत्तार ची गाडी वरील आमदार स्टिकर  काढून मराठा आंदोलकांनी  निषेध व्यक्त केला.. गाडीत अब्दुल सत्तार नव्हते मात्र त्यांचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती आहे...

31 Oct 2023, 11:55 वाजता

मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन पेटल्यानंतर त्याची धग आता एसटीला बसलीय.. राज्यभरातले 36 एसटी डेपो बंद आहेत.. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.. अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बसची जाळपोळ करण्यात आली तर काही ठिकाणी तोडफोडही करण्यात आलीय... मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे... मुंबई, नागपूर, कोकण, पुणे, अमरावती या विभागांमधली एसटीची सेवा सुरळीत सुरू आहे. एसटी बसच्या जाळपोळीत सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झालंय. तर वाहतूक काही ठिकाणी पूर्ण बंद किंवा अंशत बंद असल्याने एसटीचा दररोजचा अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडतोय..

31 Oct 2023, 11:43 वाजता

मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली.

31 Oct 2023, 11:23 वाजता

Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे. आता शेती शब्द आलाय. या शब्दाला मराठे कमी लेखणार नाहीत. आम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार आहोत. यासाठी अभ्यासकांसोबत चर्चा करु असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.