Maratha Reservation LIVE: नांदेडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले जमाव बंदीचे आदेश

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे.  

Maratha Reservation LIVE:  नांदेडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले जमाव बंदीचे आदेश

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. संतप्त जमावाने राजकीय नेत्यांची घरे, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.

31 Oct 2023, 10:53 वाजता

मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंकीचं घर पेटवल्यानंतर आता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातल्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सकल मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

31 Oct 2023, 09:56 वाजता

मावळ मधील कातवी गावातील मराठा आंदोलक आक्रमक झालेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मावळ तालुक्यातील शासकीय कार्यालय बंद करावीत असं पत्र कातवीच्या सकल मराठा समाजाने मावळ तहसीलदारांना दिलंय.शासकीय कार्यालय उघडी दिसली तर होणाऱ्या परिणामाला मावळ प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिलाय. तसंच आमदार नितेश राणे यांना शांत बसण्याचा इशारा देत मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर फिरून देणार नाही असं वक्तव्यही त्यांनी केलंय. 

31 Oct 2023, 09:45 वाजता

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मालेगावच्या मुंगसे बाजार समितीच्या व्यापऱ्यांनी आज कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व जाती धर्माच्या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन हा घेतला निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलावसाठी आणू नये असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले.

31 Oct 2023, 09:39 वाजता

'फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांतून जन्मलेल्या...'; मराठा आरक्षणासाठी मिटकरींचं शिंदेंना पत्र! केली 'ही' मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारपासून ज्यांची कुणबी म्हणून नोंद आढळून आली आहे त्यांना तात्काळप्रमाणपत्र वाटली जातील असं सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा मुंबईतील सागर बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर मराठा आरक्षणाच्या विषयावर बैठक घेऊ चर्चा केली. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते सध्याच्या राजकीय घडामोडींपासून दूर आहेत. मात्र असं असलं तरी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. येथे क्लिक करुन वाचा अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं संपूर्ण पत्र.

31 Oct 2023, 09:37 वाजता

मनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती! म्हणाल्या, 'त्यांनी आपल्या...'

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागलं. राज्यातील अनेक भागांमधून हिंसाचाराच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. बीडमध्ये 2 आमदारांची घर आंदोलकांनी जाळली. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा बीड आणि धाराशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. हिंसांचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना अर्ल्ट देण्यात आला आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नागरिकांना शांततेचं आव्हान केलं आहे. तसेच सुप्रिया सुळेंनी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटलांनाही अगदी हात जोडून एक विनंती केली आहे. येथे क्लिक करुन वाचा सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या आहेत.

31 Oct 2023, 09:25 वाजता

रक्तदान करुन आमदार बच्चू कडू मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.. 6 नोव्हेंबरला सिंदखेडराजामध्ये बच्चू कडू रक्तदान करतील... मराठा आंदोलन टोकावर गेलंय, मात्र हे आंदोलन हिंसक न होण्याची काळजी घेण्याचं आवाहनही बच्चू कडू यांनी केलंय. तसंच सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेण्याची मागणीही बच्चू कडूंनी केलीय..

31 Oct 2023, 09:12 वाजता

31 Oct 2023, 08:53 वाजता

धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने संचारबंदी लागू करण्यात आलीय.. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केले आहे.. धाराशिवमध्ये मराठा आंदोलन पेटल्याचं दिसतंय.. रास्ता रोको तसंच जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत.. अनेक ठिकाणी एसटी पेटवून देण्यात आल्यात. तेव्हा सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान होत असल्यानं धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय. संचारबंदीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलीय.

31 Oct 2023, 08:35 वाजता

31 Oct 2023, 08:18 वाजता

'खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून...'; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी सायंकाळी उपस्थितांबरोबर संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील स्टेजवर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतानाच अशक्तपणामुळे ते कोसळले. त्यानंतर उपस्थितांच्या आग्रहानंतर त्यांनी थोडं पाणी प्यायलं. आज म्हणजेच मंगळवारी (31 ऑक्टोबर 2023 रोजी) मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या शरीरावर या आमरण उपोषणाचा नेमका काय परिणाम होत आहे यासंदर्भातील एका डॉक्टरांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा...