Team India Victory Parade LIVE Updates: चॅम्पियन टीम इंडिया वानखेडेवर पोहोचली, विराट रोहितसह खेळाडूंचा जल्लोष

Team India Victory Parade Live Updates: मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत... 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं.... अशा महत्वाच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्विकवर  

Team India Victory Parade LIVE Updates: चॅम्पियन टीम इंडिया वानखेडेवर पोहोचली, विराट रोहितसह खेळाडूंचा जल्लोष

Team India Victory Parade Live Updates: मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत... 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं.... अशा महत्वाच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्विकवर

4 Jul 2024, 20:49 वाजता

आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय... हे चॅम्पियन्स विशेष बसनं हॉटेल ट्रायडंटमधून वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं रवाना होतील... विजेत्या टीमची झलक पाहण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय... विशेष बसमधून ते वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील.. त्याठिकाणी विश्वविजेत्या टीमचा जंगी सत्कार करण्यात येईल. हा सोहळा पाहण्यासाठी वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी केलीय...

4 Jul 2024, 19:31 वाजता

भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषक जगज्जेते ठरलेली टीम इंडियाची बस नरिमन पॉईंट परिसरात दाखल झालीय... आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय... हे चॅम्पियन्स विशेष बसनं हॉटेल ट्रायडंटमधून वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं रवाना होतील... विजेत्या टीमची झलक पाहण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय..

4 Jul 2024, 17:12 वाजता

मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत... 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं... यंदा बार्बाडोसमध्ये टीम इंडियानं दुस-यांदा टी 20 वर्ल्डकप जिंकला.. आता त्याच विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मरिन ड्राईव्हवर तोबा गर्दी केलीय...

 

4 Jul 2024, 15:34 वाजता

पुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी अडवल्या प्रकरणी ग्रामस्थांवर कारवाई

सरपंच आणि उपसरपंचासह उरुळी कांचन ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या उरुळीकांचन विसाव्यादरम्यान पालखी नियोजनावरून सोहळ्याचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात झाला होता वाद

विश्वस्तांकडून विसाव्याचे ठिकाण बदलण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी अडवला होता नगाऱ्याचा गाडा

मंदिरामध्ये पादुका ठेवण्याऐवजी महात्मा गांधी विद्यालयात विसावा घेण्यास ग्रामस्थांचा विरोध

विरोधात रूपांतर वादात झाल्याने पोलिसांचा हस्तक्षेप आणि गुन्हा दाखल

4 Jul 2024, 14:05 वाजता

भारतीय संघाचं स्वागत करतो, पण बस गुजरातमधून का आणली? आदित्य ठाकरेंची विचारणा

4 Jul 2024, 13:36 वाजता

भारतीय क्रिकेट संघ टी २० वर्ल्ड कप घेऊन मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास पोहचणार

4 Jul 2024, 12:26 वाजता

मुंबई विकली जात आहे.भूखंड अदानीला दिले जात आहेत, असा आरोप विजय वड्डेटीवार यांनी केलाय.
कुर्ल्यातील दुग्धविकास विभागाची जमीन स्वस्त दरात देण्यात आली.कोण आहे हा एवढं मेहरभान का होताय?
मिठाग्रहाची जागा एक इंच देणार नाही असं भाजपचा एक नेता बोलला होता. ही जागा देण्यात आली.अदानी मुंबई लुटत आहे. हिंमत असेल सरकारने उत्तर द्यावं. मुलूंडचाही भूखंड अदानीला दिला जातोय विरोधकांनी आक्रमक होत सभात्याग केला

4 Jul 2024, 12:18 वाजता

परिषदेच्या महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येते की, दिनांक ०७ व २७ जुलै, २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचे खालील १५ सदस्य निवृत्त होणार आहेत :-

१) विलास विनायक पोतनीस

२) . निरंजन वसंत डावखरे

३) किशोर भिकाजी दराडे

४) कपिल हरिश्चंद्र पाटील

५) अॅङ अनिल दत्तात्रय परब

६) महादेव जगन्नाथ जानकर

७) डॉ. मनिषा श्यामसुंदर कायंदे

८) विजय ऊर्फ भाई विठ्ठल गिरकर

९) अब्दुल्ला खान अ.लतिफ खान ऊर्फ बाबाजानी दुर्राणी

१०) . निलय मधुकर नाईक

११) रमेश नारायण पाटील

१२) रामराव बालाजीराव पाटील

१३) डॉ. मिर्झा वजाहत मिर्झा अथर

१४) डॉ. प्रज्ञा राजीव सातव

१५) जयंत प्रभाकर पाटील

4 Jul 2024, 10:45 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर
लोकसभा निकालानंतर मोदींचा पहिलाच मुंबई दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगांव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन
विविध विकासकांच्या भूमीपूजनासाठी नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार
लोकसभा निकालानंतर आता केंद्रिय नेत्यांचं विधानसभा होणाऱ्या राज्यांकडे लक्ष
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व

4 Jul 2024, 10:43 वाजता

सुनील केदार यांना दिलासा नाही, उच्च न्यायालयाचा  शिक्षेला स्थगिती देण्यास नकार