Team India Victory Parade LIVE Updates: चॅम्पियन टीम इंडिया वानखेडेवर पोहोचली, विराट रोहितसह खेळाडूंचा जल्लोष

Team India Victory Parade Live Updates: मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत... 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं.... अशा महत्वाच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्विकवर  

4 Jul 2024, 07:50 वाजता

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांचे उद्या देवाचे नित्योपचार काळ वगळून काम बंद आंदोलन

महाराष्ट्र नव निर्माण सेना तालुका अध्यक्षाने भक्त निवास मधील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप

4 Jul 2024, 07:45 वाजता

राज्यातील धरणांचा पाणीसाठा अद्यापही तळाला; पुणे, औरंगाबादमध्ये कमी साठा..अमरावती, विदर्भात तुलनेने जास्त, तर पुणे आणि औरंगाबाद विभागांत सर्वांत कमी पाणीसाठा आहे.

4 Jul 2024, 07:08 वाजता

सासवडचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुढे प्रस्थान झालीये. सासवडकरांचा पाहुणचार घेऊन माऊली पंढरी कडे निघालेत. टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंग गवळणी गात लाखो वारकरी माऊलींच्या पालखीसह पंढरी कडे निघालेत. आज जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. दरवर्षी खंडोबा नगरी जेजुरीत माऊलींच्या पालखीचं भंडाऱ्याची मुक्त उधळण करून स्वागत केले जाते. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीने अवघा आसमंत न्हाऊन निघतो. तो क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकऱ्यांचा मेळा आज जेजुरी नगरीत दाखल होणार आहे.

4 Jul 2024, 07:01 वाजता

पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी विविध यंत्रणांच्या सक्रिय सहभागाच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यात याव्यात. तसेच मोठ्या प्रमाणात रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करत तात्काळ उपचार करण्याला प्राधान्य द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी एकत्रित पद्धतीने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.