Team India Victory Parade LIVE Updates: चॅम्पियन टीम इंडिया वानखेडेवर पोहोचली, विराट रोहितसह खेळाडूंचा जल्लोष

Team India Victory Parade Live Updates: मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत... 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं.... अशा महत्वाच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्विकवर  

Team India Victory Parade LIVE Updates: चॅम्पियन टीम इंडिया वानखेडेवर पोहोचली, विराट रोहितसह खेळाडूंचा जल्लोष

Team India Victory Parade Live Updates: मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत... 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं.... अशा महत्वाच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्विकवर

4 Jul 2024, 10:28 वाजता

वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार..दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती 

 वसंत मोरे यांच्यासोबत संजय राऊत आणि  शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते  हे सुद्धा मातोश्रीवर  उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत

लवकरच शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे 

 त्याआधी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत वसंत मोरे मातोश्रीवर चर्चा करतील

 लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा  आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी  वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती

 मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने  वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही

 त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती 

 आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता  वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी माहिती

4 Jul 2024, 10:08 वाजता

Breaking News Live Updates: भारतीय क्रिकेट संघाचे आज दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं

4 Jul 2024, 10:03 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री शंभूराज देसाई हे बेपत्ता झाले असून त्यांना शोधून आणणाऱ्यास कोंबड्याच बक्षीस देण्यात येईल अशा आशयाचे बॅनर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे भर बाजारात लावण्यात आलाय

4 Jul 2024, 09:36 वाजता

अजित पवारांवरील भ्रष्टाचा-याच्या आरोपांवर उत्तर महाविकासआघाडीनं नाही तर महायुतीनंच द्यावं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय. 

अजितदादांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

'अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप फडणवीसांनी केलेत'
'भ्रष्टाचाराच्या आरोपांवर फडणवीसांनी उत्तर द्यावं',अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय.

4 Jul 2024, 09:26 वाजता

पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंगूसह साथीचे रोग पसरण्याला सुरुवात होते. छत्रपती संभाजी नगर शहरातही डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झालीय.डेंग्यूची साथ रोखण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत 142 घरांमध्ये डासांची अंडी आढळून आली त्यामुळे आरोग्य विभागाकडून साथीच्या रोगाच्या निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे. तर औषध फवारणी करून ही अंडी नष्ट करण्यात आली असून आतापर्यंत शहरातील 7705 घरांची तपासणी केली आहे. सद्यस्थितीला शहरात डेंग्यूचे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे डासांची अंडी आढळलेल्या भागावर महापालिकेकडून विशेष लक्ष दिल जात असल्याच प्रशासनाने सांगितलय.

4 Jul 2024, 09:07 वाजता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आमली पदार्थ सापडल्याच्या घटनेची सरकारकडून गांभीर्याने दखल

घटनेबाबत संबंधित पोलीस ठाण्यात हे पर्याय नोंदविण्यात आला आहे कुलगुरूंनी चार सदस्य समिती स्थापन केल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती

समितीचे कामकाज सुरू असून अहवाल आल्यानंतर तात्काळ दोषीवर कारवाई करणार.

4 Jul 2024, 08:47 वाजता

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस

आजरा तालुक्यातील साळगाव इथल्या बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता बंद

वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू

तर चंदगड तालुक्यातील हिंडगाव इथल्या इब्राहीमपूर पुलावर घटप्रभा नदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद

या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आलेली आहे

4 Jul 2024, 08:19 वाजता

ड्रग माफिया ललीत पाटील याला ससून हाँस्पीटलमध्ये एक्स रे साठी घेऊन जाणारे आणि ललीत पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणार्या दोन पोलीसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश.(removal from gov.service) पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.

4 Jul 2024, 08:15 वाजता

गुणरत्न सदावर्ते आणि आणि जयश्री पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेचा पुण्यात आक्रोश मोर्चा, 

पुण्यातल्या सहकार आयुक्त कार्यालयावर आज निघणार निघणार आक्रोश मोर्चा 

एसटी को-ऑप बँकेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटकेची मागणी

संचालक पद रद्द करूनही सदावर्ते पती-पत्नीचा बँकेत हस्तक्षेप असल्याचा आरोप

4 Jul 2024, 07:58 वाजता

टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाली. भारतीय संघानं 29 जूनला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस इथं रंगलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय.

 

वर्ल्डकप जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर टीम इंडियाचं आज सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झालं. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले.

 

त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मानं तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते, तो वर्ल्डकप दाखवला.

 

वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. त्यानंतर टीम इंडियाचं दिल्लीच्या आयटीसी मौर्य हॉटेलमध्येही जल्लोषात स्वागत झालं. चाहत्यांच्या गराड्यात खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी इथं एक खास केक देखील तयार करण्यात आलाय.