छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आज कर्जवाटपाची पहिली रक्कम आज बॅंकाना अदा करण्यात आले. आज दिवसभरात 2 लाख 39 हजार 610 शेतकऱ्यांच्या नावे 899.11 कोटी रूपये कर्जमाफीसाठी देण्यात आले.
त्यातले 392 कोटीची रक्कम ही 11 वेगवेगळ्या बँकांना ट्रान्सफर कऱण्यात आले आहेत. रक्कम हस्तांतरीत झाल्याने कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे.