लॉकडाऊन ५ : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय

कुलगुरूंच्या बैठकीत घेतला निर्णय 

Updated: May 31, 2020, 09:33 PM IST
लॉकडाऊन ५ : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय  title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला. आतापर्यंत झालेल्या सर्व सेमिस्टरची सरासरी काढून विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच शिक्षण कुठेही थांबणार नाही. पुढील शिक्षणाकरता विद्यार्थ्यांना वाट मोकळी करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच म्हटलं आहे. 

शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागासोबत बैठक घेण्यात आली. तसेच कुलगुरूंच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेता सरासरी काढून विद्यार्थ्यांना गुण देऊन मार्क्स द्यायचे आहेत. आणि त्यांना पास करायचे आहे. त्यांना थांबवायचं नाही. (लॉकडाऊन कचऱ्याच्या टोपलीत, मुख्यमंत्र्यांचं 'पुनश्च हरी ओम'!)

शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ द्यायचा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरीकाढून गुण द्यायचे आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की, आपण यापेक्षा अधिक मार्क कमवू शकत होतो. त्या विद्यार्थ्यांना योग्य ती वेळ पाहून पुन्हा परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा विचार करत आहोत. पण या परीक्षा कधी होतील याबाबत कोणतीच माहिती नाही. परीक्षा घेण्यासारखी स्थिती सध्या नाही. त्यामुळे या परीक्षा कधी होतील ते आता सांगण कठीण आहे. 

कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विद्यार्थ्यांच आयुष्य न थांबता पुढील शिक्षणाकरता अथवा पुढील वाटचालीकरता त्यांचा मार्ग मोकळा करत आहोत. आम्ही निर्णय घेत असलो तरी आमच्यातील पालक अजून जीवंत आहेत. लाखो विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत त्यांना कोरोनाच्या परिस्थितीत असं मोकळं सोडणार नाही. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

'लॉकडाऊन' हा शब्द कचऱ्याच्या टोपलीत टाकून 'मिशन बिगीन अगेन' असं म्हणत आपण नव्या आयुष्यासाठी सज्ज होऊया असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. 'पुनश्च हरि ओम' म्हणत नव्याने सुरूवात करू असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.