lockdown by tiger हा फोटो पाहून मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेतेही म्हणतील, "बघताय काय रागानं?, LockDown लावलाय वाघानं?"

"बघताय काय रागानं? overtake केलंय वाघानं, असं ट्रकच्या मागे तुम्ही हायवेवर लिहिलेलं पाहिलं असेल, पण तुम्ही बातमीतला

Updated: Apr 22, 2021, 02:25 PM IST
 lockdown by tiger हा फोटो पाहून मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेतेही म्हणतील, "बघताय काय रागानं?, LockDown लावलाय वाघानं?" title=

नागपूर  : "बघताय काय रागानं? overtake केलंय वाघानं, असं ट्रकच्या मागे तुम्ही हायवेवर लिहिलेलं पाहिलं असेल, पण तुम्ही बातमीतला खालचा वाघाचा फोटो पाहाल आणि म्हणाल "बघताय काय रागानं?, LockDown लावलाय वाघानं?" म्हणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याची घोषणा करण्याआधी एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याआधी निर्बंध लावूनही रस्त्यावरची येजा काही राज्यात कुठे कमी होताना दिसत नव्हती. पण या फोटोत वाघाने जो काही लॉकडाऊन लावला आहे. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एकाचीही हिंमत नाही की तो रस्ता क्रॉस करेल. बरं या वाघाला रस्ता ओलांडण्यासाठी पासबिस, व्हीआयपी बीआयपी सांगण्याची गरज नाही. नियमावली वैगेर, सत्ताधारी, विरोधक वैगरे याला येथे कुठे थारावाराच नाही. वाघोबाचा मूड होईल तेव्हा तो उठेल...रस्त्याने चालत हळूच बाजूला होईल तेव्हा तुमचा रस्ता सुरु...

हा फोटो कुठला आहे?

हा वाघ ताडोबाचा आहे.  IFS - Indian Forest Service मधील सुशांत नंदा या वनविभागातील अधिकाऱ्याने देखील ट्ववीटरवर हा फोटो शेअर केला आहे. Just another day in India where the king thought it fit to enforce the lockdown असं ट्ववीट त्यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील ताडोबाजवळील मोहर्ली-पदमापूर रोड वरील हे दृश्य आहे. पत्रकार विजय पिंजरकर यांनी हा फोटो ट्ववीट केला आहे. ONE PICTURE, MANY STORIES असं कॅप्शन त्यांनी आपल्या फोटोला दिलं आहे.