अंबरनाथमध्ये १ ते ६ जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊन

अंबरनाथ शहरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार 

Updated: Jun 29, 2020, 04:31 PM IST
अंबरनाथमध्ये १ ते ६ जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊन

अंबरनाथ : शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अंबरनाथ शहरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार आहे. याबाबतचा आदेश उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये १ जुलै ते ६ जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे.

२ जुलैपासून पुढील १० दिवस ठाणे शहरात देखील संपूर्ण लोकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. अशी माहिती ठाणे शहर पोलिसांनी ट्विट करुन दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

मोठी बातमी: ठाण्यात २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन