सांगली : इरळीत सलून व्यावसायिकाने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला. विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोरोनाचा संकट असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याचने या सलून व्यावसायिकांने टोकाचे पाऊल उचलले, असे सांगण्यात येत याहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यावसायिक आणि त्याच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
सांगली येथील इरळीत सलून व्यावसायिकाचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न । विषारी द्रव्य घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न । लॉकडाऊनमुळे उपासमार ।दोघांची प्रकृती चिंताजनक https://t.co/Ct4fYeN6GF
#lokdown @CMOMaharashtra@rajeshtope11@OfficeofUT@AjitPawarSpeaks
@ashish_jadhao pic.twitter.com/Ffgqs0t1Jv— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 12, 2020
नवनाथ उत्तम साळुखे (३५) असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याचा मुलगा अजय साळुखे (४) या लहनाग्याला त्यांने विषारी औषध पाजल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांनाही सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
गेले तीन महिने लॉकडाऊनमुळे सलून व्यवसाय बंद आहे. या काळात शासनाने सलून व्यावसायिकांना तांदूळ आणि गहू याव्यतिरिक्त काहीच दिले नाही. घरचा इतर खर्च कसा करायचा हा प्रश्न त्याच्या समोर होता. लॉकडाऊनमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे हा व्यावसायिक तणावाखाली होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे नवनाथ साळुखे यांचे सलून व्यावसायिक असून पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे.