close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर :पार्थ पवार, भुजबळ आणि अमोल कोल्हेंना उमेदवारी

 मावळमधून पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी  देण्यात आली आहे

Updated: Mar 15, 2019, 04:10 PM IST
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर  :पार्थ पवार, भुजबळ आणि अमोल कोल्हेंना उमेदवारी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी  देण्यात आली आहे. तर नाशिक मधून समिर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर शिरूरमधून अमोल कोल्हे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार माढा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होते. पण आपण निवडणुक लढवणार नसल्याचे पवारांनी जाहीर केले आहे. कालच राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्यासह अन्य नावे जाहीर करण्यात आली होती. 

काल पहिल्या यादीमधून पार्थ पवारांचे नाव वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. याबाबत जयंत पाटील म्हणालेत, योग्य तेव्हा त्याबाबतचा निर्णय घेऊन योग्य वेळी नाव जाहीर करू. तो निर्णय आमच्या मनाप्रमाणे जाहीर करू द्या, असेही त्यांनी यावेळी मिश्किलपणे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पार्थसाठी माघार घेतल्याचे सांगितले होते. तरीही पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापुरातील हातकणंगलेची जागा सोडण्यात आली आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादीचे जाहीर उमेदवार

मावळ - पार्थ पवार 
नाशिक- समिर भुजबळ 
शिरूर- अमोल कोल्हे 
रायगड - सुनील तटकरे
बारामती - सुप्रिया सुळे
सातारा - उदयनराजे भोसले
कोल्हापूर - धनंजय महाडिक
बुलडाणा - डॉ.  राजेंद्र शिंगणे
जळगाव - गुलाबराव देवकर
परभणी - राजेश वीटेकर
मुंबई उत्तर - पूर्व संजय दिना पाटील
ठाणे - आनंद परांजपे
कल्याण - बाबाजी बाळाराम पाटील
लक्षद्वीप - महमंद फैजल
बीड- बजरंग सोनावणे
हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटना (जाहीर पाठिंबा)