रायगड : या मतदारसंघात कुणबी मतांचा प्रभाव आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गिते यांना ४ लाख १३ हजार ५४६ मते, तर ए. आर अंतुले यांना २ लाख ६७ हजार २५ मते मिळाली होती. प्रविण ठाकूर हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना ३९ हजार मते मिळाली होती.
२०१४ ला मोदी लाट होती. तरीही अवघ्या २ हजार मतांनी अनंत गिते यांचा विजय झाला होता. शिवसेनेच्या अनंत गिते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मते, राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ६८ मते, तर शेकापचे रमेश कदम यांना १ लाख २९ हजार मतं मिळाली होती. गिते आणि तटकरे यांच्यात कांटे की टक्कर झाली होती.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
अनंत गिते | शिवसेना | 396178 |
सुनील तटकरे | राष्ट्रवादी | 394068 |
रमेश कदम | शेकाप | 129730 |
नोटा | नोटा | 20362 |
यशवंत गायकवाड | बसपा | 10510 |