Sudhakar Badgujar Dismissal Notice : नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली. सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र सुधाकर बडगुजर यांनी ही नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता याप्रकरणी सुधाकर बडगुजर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे बोललं जात आहे.
सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर यांचे नाव चर्चेत आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी तडीपारची नोटीस काढल्याने सध्या नाशिकचं राजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमधून पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस आल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तसेच ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात नोटीस काढल्याने सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.
सुधाकर बडगुजर हे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत. ते नाशिकचे जिल्हाप्रमुख आहेत. सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सलीम कुत्ता यांच्या नाशिकमधील फार्महाऊसवर त्यानं लग्न केल्याचाही आरोप आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली होती.
नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दाऊदच्या टोळीतील सदस्यासोबत पार्टी करताना आणि डान्स करताना आढळला. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी याचे व्हिडीओ आणि फोटो विधानसभेत दाखवले होते. तसेच हा मुद्दा दादाजी भुसे, आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी कालच्या मेळाव्यात निशाणा साधला होता.
सुधाकर बडगुजर यांनी महापालिकेत ठेकेदार म्हणून काम केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते. सुधाकर बडगुजर यांनी महापालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी सभागृह नेता, विरोधी पक्षनेता अशी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बडगुजर हे नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार होते. भाजपच्या सीमा हिरे यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी पक्षाने बडगुजर यांची नाशिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती केली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत आहेत.
BRN
(20 ov) 209/5
|
VS |
TAN
215/4(19.2 ov)
|
Tanzania beat Bahrain by 6 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.