LokSabha Election Result: उद्धव ठाकरेंपेक्षा शिंदे गटाचा जास्त जागांवर विजय, शिवसेना नेत्याच दावा, 'हिरव्या मतांवर उबाठाची मदार'

LokSabha Election Result: शिवसेना (Shivsena) फुटीनंतर होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्याने निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाला (Thackeray Faction) जास्त जागांवर विजय मिळला आहे. पण थेट लढतीत आम्ही जास्त जागा जिंकल्या असून शिवसेना अव्वल असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 6, 2024, 07:37 PM IST
LokSabha Election Result: उद्धव ठाकरेंपेक्षा शिंदे गटाचा जास्त जागांवर विजय, शिवसेना नेत्याच दावा, 'हिरव्या मतांवर उबाठाची मदार'

LokSabha Election Result: शिवसेना (Shivsena) फुटीनंतर होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्याने ठाकरे आणि शिंदे गट यांच्यापैकी कोणाचं पारडं जड ठरणार याची सर्वांना उत्सुकता होती. निवडणुकीत नकली शिवसेना अशी टीका झाल्याने ही दोन्ही गटांसाठी आत्मसन्माची लढाई होती. दरम्यान शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाला (Thackeray Faction) जास्त जागांवर विजय मिळला आहे. पण थेट लढतीत आम्ही जास्त जागा जिंकल्या असून शिवसेना अव्वल असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला आहे. 

शीतल म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून आकडेवारी सादर केली आहे. उद्धवस्त गटाला मराठी लोकांनी नाकारलं आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी असली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे यावर शिक्कामोर्तब केले असा दावा त्यांनी केला आहे. हिरव्या मतांवर उबाठाची मदार, हीच खरी वस्तुस्थिती अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

"शिवसेना X उबाठा समोरासमोर १३ जागा. निकालात शिवसेनेला उबाठापेक्षा जास्त जागांवर विजय. जनतेची मिळालेली मतं शिवसेनेला तब्बल 62 लाख 35 हजार 584… उबाठापेक्षा नक्कीच जास्त. बाकी सगळ्या गोष्टीत पण शिवसेना अव्वल!!! आणि उद्धवस्त गटाला मराठी लोकांनी नाकारलं आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी असली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे यावर शिक्कामोर्तब केले, त्याचा हा पुरावा… हिरव्या मतांवर उबाठाची मदार.. हीच खरी वस्तुस्थिती," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने 9 तर शरद पवार यांच्या पक्षाने 8 जागांवर विजय मिळवला.विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिल्याने महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच्या नावे 31 जागा झाल्या आहेत.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x