Lonavala News: लोणावळा हे ठिकाणं जितकं नयनरम्य आणि पर्यटनासाठी लोकप्रिय (Popular Tourist Places in Maharashtra) असं ठिकाणं असलं तरी येथेही आता मोठ्या प्रमाणात अपघात घडताना दिसत आहेत. त्याचबरोबर येथे गुन्हेगारीही वाढताना दिसते आहे. सध्या अशा प्रकरणांमुळे सगळीकडेच मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. लोणवळ्याला (Lonavala) अनेक मोठ्या पार्ट्या होताना आपण कायम त्याचसोबत पार्टी करताना कुठेतरी अपघात झाल्याच्या बातम्याही पाहत असतो. सध्या असाच एक प्रकार लोणावळ्यात (Lonavala) घडला आहे. या प्रकारानं सगळीकडेच खळबळ माजली आहे. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा तरूणाई आणि त्यांच्या पार्ट्यांच्या वेळी होणाऱ्या अपघातांबाबत पुन्हा एका सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावेळी एका तरूणाचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेगळीच खळबळ माजली आहे. (Lonavala 22-Year-Old Tourist Dies After Drowning In swimming Pool Who Comes to Celebrate Friends Birthday)
लोणावळा शहरात स्विमिंग पूल (Swimming Pool) मध्ये बुडून मृत्यू होण्याची अजून एक दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे स्विमिंग पूलची सुरक्षा आणि हे पूल अधिकृत की अनधिकृत हा प्रश्न आता ऐरणी वरती आलेला आहे. जुना खंडाळा (Khandala) भागातील एका खाजगी बंगल्यात मंगळवारी रात्री उशिरा एक युवक स्विमिंग पूल मध्ये बुडाला. निखिल संपत निकम असं या मयत झालेल्या पर्यटक तरुणाच नाव आहे. निखिल आणि काही मित्र लोणावळ्यात त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी आले होते.
त्यादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा स्विमिंग पूल मध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या या सर्व तरुणांनी मद्य प्राशन केले होते. या घटनेची माहिती समजताच लोणावळा शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून ही दुर्घटना कशी घडली आणि त्याची कारण काय याचा तपास करत माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन या स्विमिंग पूल प्रश्नावरती नक्की काय निर्णय घेता काय कारवाई करत आहे याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात साशंकता निर्माण होऊ लागली आहे.
हेही वाचा - Crime Story: अल्पवयीन मुलीसोबत पळून गेली दोन मुलांची आई; नक्की काय भानगड?
लोणावळा हे आपल्या सर्वांचेच आवडते पर्यंटन स्थळं आहे. परंतु लोणवळ्याला पार्ट्या, डान्स यांची मज्जा करणं हे आता लोकांच्या अंगलट येऊ लागलं आहे. 31 डिसेंबरलाहा असाच एक प्रकार एका मुलासोबत घडला होता. त्यानं दुकानाजवळ गाडी पार्क केली म्हणून त्याच्यावर कोयत्यानं (Koyta Gang Pune) वार करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या गोष्टीनं सगळीकडेच खळबळ माजली आहे. त्यातून या नव्या घटनेनं पुन्हा एकदा मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.